आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीची विक्री:मुली पळवून नेणाऱ्या टोळीतील 5 जण जेरबंद, नाशिकच्या अल्पवयीन मुलीची मध्य प्रदेशात विक्री

ओझर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकमधून एका अल्पवयीन मुलीला मध्य प्रदेशात विक्री केल्याची घटना उघडकीस आली आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी या घटनेत पाच संशयितांना ताब्यात घेतले असून यामध्ये दोन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे.

तालुका पोलिस स्टेशन येथे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ओझर शहरातून एका १४ वर्षांच्या मुलीचे अपहरण झाले होते. ओझर पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज तपासताना मुलीला एक महिला नेताना दिसून आली. हाच धागा पकडून वेगवेगळी पथके तपासासाठी पाठवत प्रियंका देविदास पाटील( रा. कार्बन बाका, सातपूर, नाशिक, सध्या ओझर, ता. निफाड) या महिलेला ताब्यात घेतले. तिला पीडित मुलीबाबत विचारले असता तिने मैत्रीण नागे रत्ना कोळी (रा. ओझर, १० वा मैल, ता. निफाड) हिच्या मदतीने शिरपूर येथील एक महिला व पुरुषास १ लाख ७५ हजार रुपयांत विक्री केल्याचे समोर आले.

तपास पथके धुळे जिल्हा व गुजरात राज्यात रवाना केले. ओझर पोलिसांना शिरपूर परिसरातून महिला रत्ना विक्रम कोळी, सुरेखाबाई जागो मिला यांना गुन्ह्याच्या तपासासाठी ताब्यात घेतले. त्यांनी या मुलीस बडोदा येथे लग्नासाठी दिले असल्याचे सांगितले. दरम्यान, त्या महिलेकडून अपहरण करतानाचा व्हिडिओ “दिव्य मराठी’च्या हाती लागला आहे.

खरगोन जिल्ह्यात सापडली मुलगी
तपास पथकाने गुजरातमध्ये पीडित मुलीचा शोध घेतला. यानंतर ही मुलगी मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात असल्याचे समजले. त्यानुसार तपास पथक खरगोनला रवाना झाले. तेथे बाबुराम येडू मनसारे, गोविंद नानुराम मनसारे (रा. लखापूर, ता.भिकनगाव) याच्या घरात ही अल्पवयीन पीडित सापडली. दोन्ही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

बातम्या आणखी आहेत...