आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकुटुंब, समाज वा देशाच्या प्रगतीसाठी ज्येष्ठ नागरिकांची भूमिका महत्त्वपूर्ण असतेे. पाठीशी असलेला अनुभव हा सर्वांसाठी मार्गदर्शक ठरत असताे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांचा याेग्य ताे सन्मान झाला पाहिजे, अशा संदेश देत नाशिकच्या पाच ज्येष्ठ नागरिकांनी रसि्पेक्ट सीनिअर ही माेहीम सुरू केली आहे. या माेहिमेंतर्गत काेची ते कन्याकुमारी अशा तब्बल ४५० किलाेमीटरचा प्रवास सायकलद्वारे पूर्ण करत प्रबाेधन करत आहे.
ज्येष्ठ नागरिक हा सर्वांसाठी आधार असताे. ज्येष्ठांना समाजात याेग्य ताे मानसन्मान मिळावा, शासनाने ज्येष्ठांसाठी विविध याेजना राबवाव्यात याबाबत जनजागृतीसाठी नाशिकच्या ज्येष्ठांनी पुढाकार घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर रसि्पेक्ट सीनिअर या माेहिमेतर्गत राबवण्यासाठी शहरातील डाॅ. शरद पाटील, डाॅ. विनय चाैधरी, किशाेर अहिरराव, डाॅ. सतीश पाटील, जगदीश शास्त्री यांनी पुढाकार घेतला आहे. याचसाठी अत्यंत आव्हानात्मक असलेली काेची ते कन्याकुमारी अशा सायकल प्रवासाला सुरुवात केली. काेस्टल परसिर असल्याने सायकल चालविण्यासाठी आव्हानात्मक परसि्थिती आहे. मात्र, काेणत्याही परसि्थितीत ही राइड पूर्ण करायची याच उद्देशाने त्यांचा सायकल प्रवास सुरू असून राेज १०० किमीचा पल्ला गाठण्याचा त्यांचा निर्धार आहे. त्यांचा प्रवास ९ डसिेंबरला कन्याकुमारी येथे पूर्ण हाेईल.
ज्येष्ठांच्या सन्मानासाठी सायकल प्रवास माेहीम समाजातील सर्वांनी ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करावा या दृष्टीने ही माेहीम राबविण्यात येत आहे. यापू्र्वी गाेवा ते काेची असा सायकल प्रवास केला हाेता. त्याचा अनुभव असल्यामुळेच आता काेची ते कन्याकुमारी असा ४५० किलाेमीटरचा सायकल प्रवास करत आहे. - किशाेर अहिरराव
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.