आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:5 ज्येष्ठांची काेची ते कन्याकुमारी सायकल राइड; ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानासाठी नाशिकच्या डाॅक्टरांचा 450 किमीचा प्रवास

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुटुंब, समाज वा देशाच्या प्रगतीसाठी ज्येष्ठ नागरिकांची भूमिका महत्त्वपूर्ण असतेे. पाठीशी असलेला अनुभव हा सर्वांसाठी मार्गदर्शक ठरत असताे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांचा याेग्य ताे सन्मान झाला पाहिजे अशा संदेश देत नाशिकच्या पाच ज्येष्ठ नागरिकांनी रिस्पेक्ट सीनियर ही माेहीम सुरू केली आहे. या माेिहमेंतर्गंत काेची ते कन्याकुमारी अशा तब्बल ४५० किलाेमीटरचा प्रवास सायकलद्वारे पूर्ण करत प्रबाेधन करत आहे. ज्येष्ठ नागरिक हा सर्वांसाठी आधार असताे. अशा ज्येष्ठांना समाजात याेग्य ताे मान सन्मान मिळावा, शासनाने ज्येष्ठांसाठी विविध याेजना राबविणे गरजेचे आहे. याबाबत समाजात जनजागृती करण्यासाठी नाशिकच्या ज्येष्ठांनी पुढाकार घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर रिस्पेक्ट सीनिअर या माेहिमेंतर्गत राबवण्यासाठी शहरातील डाॅ. शरद पाटील, डाॅ. विनय चाैधरी, किशाेर अहिरराव, डाॅ. सतीश पाटील, जगदीश शास्त्री यांनी पुढाकार घेतला आहे.

याचसाठी अंत्यत आव्हानात्मक असलेली काेची ते कन्याकुमारी अशा सायकल प्रवासाला सुरुवात केली. काेस्टल परिसर असल्याने सायकल चालविण्यासाठी अत्यंत आव्हानत्मक परिस्थिती आहे. मात्र, काेणत्याही परिस्थिती ही सायकल राइड पूर्ण करायची याच उद्देशाने हा त्यांच्या सायकल प्रवास सुरू असून राेज १०० किलाेमीटरचा पल्ला गाठण्याच्या त्याचा निर्धार आहे. हा त्यांचा सायकल प्रवास ९ डिसेंबरला कन्याकुमारी येथे जात पूर्ण हाेणार आहे.

सायकल प्रवास पूर्ण करण्याची जिद्द
या माेहिमेत सहभागी सर्व सदस्यांचे ६० वर्षांपुढे वय आहे. अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती राहूनही काेणत्याही परिस्थितीत ही सायकल माेहीम पूर्ण करण्याची जिद्द आहे. संवाद साधत पुढे जाणाऱ्या या सायकलिस्टच्या नागरिकांकडूून देखील ठिकठिकाणी स्वागत केले जात आहे.

ज्येष्ठांच्या सन्मानासाठी माेहीम
समाजातील सर्वांनी ज्येष्ठांचा सन्मान करावा या दृष्टीने ही माेहीम राबविण्यात येत आहे. यापू्र्वी गाेवा ते काेचीन असा सायकल प्रवास केला हाेता. त्यामुळेच आता काेची ते कन्याकुमारी असा सायकल प्रवास करत आहे.- किशाेर अहिरराव

बातम्या आणखी आहेत...