आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासारथी आणि महाज्याेती दोन संस्थांची एकाचवेळी राज्य सरकारच्या वतीने स्थापना करण्यात आली होती. या दोन्ही संस्थांना समान न्याय देण्याचे आश्वासित केले असताना नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात सारथीला नाशिक येथील विभागीय कार्यालयासाठी ५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले. परंतु महाज्योतीच्या नागपूर येथील मुख्यालयासाठी एक छदामही तरतूद करण्यात आली नाही. राज्यभरातील आठ कोटी ओबीसी, व्हीजेएनटी प्रवर्गावर अन्याय करण्यात आला. असा आरोप महाज्योतीचे माजी संचालक प्रा. दिवाकर गमे यांनी केला आहे. मराठा, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा या घटकासाठी राज्य सरकारच्या वतीने सारथी आणि ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी या घटकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सारथी या दोन स्वायत्त संस्थांची स्थापना करण्यात आल्याने नाराजी नाट्य घडले आहे. यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा पुन्हा केला जाईल.
सारथीचे मुख्यालय पुण्यामध्ये स्थापन करण्यात आले आहे. मुख्यालय बांधकामासाठी यापूर्वीच निधी मंजूर झाला आहे. तसेच आता नाशिक येथे सुद्धा विभागीय कार्यालयासाठी मुला- मुलींच्या वसतिगृह बांधण्यासाठी ५० कोटी रुपये देण्यात आले आहे. परंतु महाज्योती या संस्थेच्या नागपूर येथील मुख्यालयासाठी जागा प्राप्त झाली असताना आणि जानेवारीमध्येच मुख्यालय बांधकामासाठी आवश्यक असलेल्या निधी मागणीचे पत्र माजी संचालकांनी दिलेले असताना महायुती आणि शासनाच्या असमन्वयात एक छदामही या अर्थसंकल्पात प्राप्त झाली नाही. स्थानिक अधिकाऱ्यांच्या हेकेखोर भूमिकेमुळेच महाज्योतीला मुख्यालय उभारणीसाठी आवश्यक असलेल्या निधीपासून वंचित रहावे लागले.
प्रत्येक विभागासाठी कार्यालय करावे
तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन्ही संस्थांना सारखाच निधी देण्यात येईल, असे आश्वासित केले होते. आताच्या सरकारने महाज्योतीला एक रुपयाही दिला नाही. पुण्यातील मुख्यालयास आधीच निधी दिला असून, नाशिकलाही विभागीय कार्यालयाला निधी दिला आहे. महाज्योतीसाठी प्रत्येक विभागामध्ये कार्यालयाची स्थापना करून नागपूर येथील मुख्यालयाच्या बांधकामासाठी निधी द्यावा. - प्रा. दिवाकर गमे ,माजी संचालक, महाज्योती
१२० काेटीचा आराखडा, मात्र निधीच नाही
नागपूरच्या मुख्य भागात सीताबर्डी येथे महाज्याेतीच्या कार्यालयासाठी ७०३६ चौ. मी.जागा देण्यात आली आहे. त्यासाठी २७ कोटी ७२ लाख रुपये जिल्हाधिकारी नागपूर यांनी चलनाद्वारे भरणा करून घेतला आहे. त्यावर करण्यात येणाऱ्या बांधकामाचा आराखडा तयार करण्यासह त्याचा प्रस्तावही तयार झाला आहे. त्यासाठी १२० कोटी रुपयांचा निधीची आवश्यकता आहे.परंतु त्यातून एक रुपयाही शासनाने अद्याप मंजूर केला नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.