आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्याचे जलसंपदा विभागाला आदेश:प्रस्तावित किकवी धरणासाठी बजेटमध्ये 50 कोटींची तरतूद करा

नाशिक10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भविष्यात शहरवासियांना पाणीटंचाईची झळ पोहाेचू नये, यासाठी काही वर्षांपासून खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ब्राह्मणवाडे शिवारातील प्रस्तावित किकवी धरणाचा विषय तातडीने मार्गी लावण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जलसंपदा विभागाला दिले आहे. येत्या बजेटमध्ये किकवी धरण उभारण्याच्या कामासाठी ५० कोटी निधीची तरतुद करण्याच्या सूचनाही त्यांनी जलसंपदा विभागाचे सेक्रेटरी दीपक कपूर यांना दिल्या आहे.

सध्या नाशिक शहराला गंगापूर धरणातून पिण्याचे पाणी उपलब्ध होत आहे. गंगापूर धरणाची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता सुमारे ६ टीएमसी इतकी आहे. शहराची व्याप्ती दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असल्याने भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यामुळे तत्कालीन सरकारने २०१० मध्ये किकवी धरण प्रस्तावित केले आहे. धरणाच्या कामासाठी लागणाऱ्या परवानग्या, मान्यता यापूर्वीच जलसंपदा विभागाला मिळाल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...