आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

50 खोके महागाई एकदम ओके:नाशकात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महागाई विरोधात आंदोलन, मोदी सरकार हटाओच्या दिल्या घोषणा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वाढत्या महागाई विरोधात प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या सुचनेनुसार प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग व शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या नेतृत्वात युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी भवन येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी '50 खोके महागाई एकदम ओके' अशा घोषणा देण्यात आल्या.

जनता भरते जीएसटी, गद्दार जातात गोहाटी..!, महागाई कशासाठी, आमदारांच्या खरेदीसाठी..! , महागाईने दुखते डोके, गद्दारांना 50 खोके... 50 खोके..!, बहुत हो गयी महंगाई की मार, चलो हटाये मोदी सरकार..! अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. देशातील वाढती महागाई नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार सर्वसमान्य जनतेवर आर्थिक भार देऊन रुग्णालय सेवा, शिक्षण यासारख्या जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावत आहे.

देशात हुकुमशाही

यावेळी उपस्थित पदाधिकारी म्हणाले, मध्यवर्ती बँकेकडून सुद्धा व्याजदर वाढवले जात आहे. यामुळे जनता मेटाकुटीला आली असून सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्कील झाले आहे. केंद्र व राज्य सरकार विरोधात आवाज उठवणाऱ्यावर विविध केंद्रीय संस्थांमार्फत अडकवले जात आहे. त्यामुळे देशात हुकुमशाही होत असल्याचा आरोप करत युवक राष्ट्रवादीने महागाई विरोधात आंदोलन केले.

पावसामुळे पिकांचे नुकसान

2 महिन्यापासुन सरकार अस्तित्वात आले परंतु फोटोसेशन व्यतिरिक्त कुठलेही ठोस निर्णय मोदी सरकार व राज्य सरकार घेऊ शकले नाही. महागाई, बेरोजगारी तसेच पावसामुळे पिकांचे झालेले नुकसान हे विषय देशातील सर्वसामान्य जनतेसाठी महत्वाचे असुन त्याबाबत कुठलाही ठोस निर्णय घेताना सरकार दिसत नाही.

केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर

व्यक्तीद्वेशाचे राजकारण सुरु आहे. जिथे सत्ता नसेल तिथे केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत ब्लेकमेल करून सत्ता हस्तगत करणे या कामात केंद्रांचे नेते व्यस्त दिसतात मग त्यात महाराष्ट्रात सत्ता हस्तगत करताना 50 खोक्याची चर्चा आज राज्य आणि देशभरात चालु आहे. अमेरिका, चीन हे विकसित देश असून भारत हा विकसनशील देश आहे. त्यामुळे भारतात महागाई निश्चित जास्त राहणार हे केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांना एसी रूम मधून काय कळणार? असा सवाल राष्ट्रवादीने उपस्थित केला.

सामान्यांची पिळवणूक

महागाई आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकार अपयशी ठरले असून केंद्र सरकार जीएसटीच्या माध्यमातून सर्वसामान्यांची पिळवणूक करत असल्याचे अंबादास खैरे म्हणाले. यावेळी महेश भामरे, प्रदेश पदाधिकारी शादाब सय्यद, जय कोतवाल, गोटू आहेर, सागर बेदरकर, दत्ता वाघचौरे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...