आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:9 लाखांवर 50 लाख रुपये व्याज घेत आणखी 20 लाखांची मागणी; खासगी सावकारावर गुन्हा

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सावकाराकडून कर्ज घेत असाल तर सावाधान व्हा, शहरात एका हाॅटेल व्यावसायिकाने ९ लाख रुपये व्याजाने घेत सावकाराला तब्बल ५० लाख ९० हजार रुपये व्याज दिले, मात्र तरीही या सावकाराने व्यावसायिकासह त्याची पत्नी व मुलीला शिवीगाळ करत आणखी २० लाखांची मागणी करत वारंवार जिवे ठार मारण्याची धमकी दिली. संशयित सावकाराविरोधात मुंबईनाका पोलिस ठाण्यात सावकारी कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती आणि सुरेश पुजारी (रा. राजीवनगर) यांच्या तक्रारीनुसार, ते हाॅटेल व्यावसायिक असून अडचण आल्याने एका बँकेतून सेवानिवृत्त झालेले अोळखीचे विजय शंकरराव देशमुख (रा. कर्मयोगीनगर, गोविंदनगर) यांच्याकडून मुंबईनाका परिसरातील एका हाॅटलमध्ये ९ लाख रुपये ५ टक्के व्याजाने घेतले हाेते. पुजारी यांनी २००७ ते २०२२ पर्यंत ९ लाखांच्या रकमेवर ४४ लाख ९० हजार रुपये रोखीने व्याज दिले आहे. तसेच उर्वरित ६ लाखांची रक्कम संशयित देशमुख यांच्या सांगण्यावरून आरटीजीएस पद्धतीने तक्रारदार पुजारी यांच्या बँक खात्यातून आॅनलाइन ट्रान्सफर केले आहे. असे एकूण ५० लाख ९० हजारांचे व्याज १६ वर्षांपासून देत आहे.

हाॅटेल व्यवसायात अडचण असल्याने पुजारी यांनी व्याजाची रक्कम देण्यास देशमुख यांना नकार दिला. मात्र संशयित देशमुख यांनी पुजारी यांच्याकडे आणखी २० लाख रुपयांची मागणी करत त्यासाठी वारंवार फोन केले. देशमुख यांनी फाेनवरून पुजारी यांना शिवीगाळ करत त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली. घरी येऊन मुलीला शिवीगाळ केली. इंदिरानगर बोगदा येथे रस्ता अडवून पैशांची मागणी करत शिवीगाळ केली. पुजारी यांनी विनंती करूनही संशयित एेकण्यास तयार नसल्याने पुजारी यांना पोलिसांत धाव घेत संशयित सावकार देशमुख यांच्याविरोधात तक्रार दिली. निरीक्षक चंद्रकात आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...