आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विळखा वाढतोय:नाशिकमध्ये 50 नवे रुग्ण, मालेगावात 448 बाधित, सोलापूूर दोनशेकडे, पुणे-पिंपरीत सापडले 103 रुग्ण

नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
लॉकडाऊनमुळे पुण्यात अडकलेल्या नांदेड जिल्ह्यातील ३८ मजुरांना सर्व प्रक्रिया करून शुक्रवारी पाठवण्यात आले. - Divya Marathi
लॉकडाऊनमुळे पुण्यात अडकलेल्या नांदेड जिल्ह्यातील ३८ मजुरांना सर्व प्रक्रिया करून शुक्रवारी पाठवण्यात आले.
  • सोलापुरात दोनशेकडे वाटचाल, दोघांचा मृत्यू, दिवसात 14 रुग्ण

जिल्ह्यात कोरोना लॉकडाऊन शिथिल केला जात असताना दुसऱ्या बाजूने कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी एकाच दिवसात जिल्ह्यात नवे ५० तर जुने दोन असे मिळून ५२ कोरोना संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याचा आकडा आता सहाशेच्या जवळ गेला असून मालेगाव नंतर नाशिक शहरातही झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. शहरात दिवसभरात १८ तर मालेगावमध्ये २७ जणांना नव्याने कोरोनाची लागण झाली आहे.  नाशिक जिल्ह्यात आता एकूण ५७२ रुग्ण झाले आहेत.

कोरोनाचा वाढता संसर्ग आता मालेगावसह नाशिक शहर आणि ग्रामीण भागातही त्याचा वेगाने प्रसार होत आहे. शुक्रवारी नाशिक शहरात आजपर्यंत चे सर्वाधिक १८ बाधित आढळेल आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीत नाशिक शहरात रुग्णांची संख्या ४४ झाली आहे.  आजपर्यत ग्रामीण भागातही कोरोनाने पन्नाशी पार केली  असून एकूण  ६१ जणांना लागण झाली आहे. सर्वाधिक येवल्यातील २५ जणांचा समावेश आहे. पण जिल्ह्याच्या संख्येत सर्वात जास्त संख्या ही मालेगाव महापालिकेची आहे. शुक्रवारी २७ जणांना लागण झाल्याने एकूण तब्बल ४४८ नागरिक कोरोना बाधित असल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यापैकी १९ जण हे जिल्ह्याबाहेरील आहे. ४५ बाधित पूर्णपणे बरे झाले आहेत. यात १९ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कराड येथील  ६ कोरोना बाधित रुग्ण कोरोना मुक्त होऊन बाहेर पडले. या सहा रुग्णांवर २३ एप्रिलपासून उपचार सुरू होते.

सोलापुरात दोनशेकडे वाटचाल, दोघांचा मृत्यू, दिवसात 14 रुग्ण 

सोलापूर - एका महिन्याच्या आता शहरात कोरोनाबाधितांची संख्या दोनशेजवळ पोहचली आहे. शुक्रवारी नव्याने १४ रूग्ण आढळले असून यामध्ये सात रुग्ण सारीचा संसर्ग तर सातजणांना कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातून बाधा झाली आहे. शास्त्रीनगर परिसरातील ५६ वर्षीय महिलेचा तर रंगभवन परिसरातील ७६ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. शहरातील एकूण रुग्णांची संख्या आता १९६ वर पोहचली आहे तर १३ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. बरे झाल्याने २९ जणांना घरी सोडण्यात आल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले. शुक्रवारी आढळलेले १४ रुग्ण पूर्वीच्या कंटेनमेंट झोनमधील रहिवासी आहेत, असेही त्यांनी या वेळी सांगिते. 

पुण्यात काेराेनाचे 103 नवीन रुग्ण वाढले, १२ जणांचा मृत्यू

पुणे शहरातील काेराेना बाधित रुग्णांची संख्या दरराेज वाढत असतानाच मृत्यूचे प्रमाण ही वाढतच चालले आहे. शुक्रवारी पुणे शहर व पिंपरी चिंचवड मध्ये एकूण १०३ नवीन काेराेना बाधित रुग्ण सापडले  असून १२ जणांचा ससून रुग्णालयात मृत्यू झाला आहे. दरम्यान, काेराेनाची लागण हाेऊन बरे झालेले आठ जणांना ससून रुग्णालयातून शुक्रवारी घरी साेडण्यात आले. तर, पिंपरी चिंचवड मधील काेविड रुग्णालयातून १४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.  काही दिवसांपूर्वी पुणे पोलिस दलातील काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. त्यातच आता अग्निशामक दलातील जवानालाही कोरोनाची लागण झाल्याचा प्रकार समोर आला असून याला प्रमुख अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी दुजोरा दिला.

जळगाव जिल्ह्यात २५ नवे रुग्ण

जळगाव | जिल्ह्यात तीन दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या मोठ्या संख्येने वाढताना दिसून येत आहे. शुक्रवारीदेखील २५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. पाचोरा येथील एका वरिष्ठ अधिकाऱ्यालाही कोरोनाची लागण झाल्याने पोलिस यंत्रणा हादरली आहे. हॉटस्पॉट झालेल्या अमळनेर येथील १६ रुग्ण, भुसावळ येथील ५, चोपडा २ तर जळगावच्या ममुराबाद आणि मेहरुण येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान,शुक्रवारी ४ काेराेना बाधितांचा मृत्यू झाला आहे. यात भुसावळ २ तर अमळनेर व पाचाेरा येथील प्रत्येकी १ रग्ण आहे.

बातम्या आणखी आहेत...