आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागा रिक्त:सिव्हिल, मेकॅनिकल व इलेक्ट्रिकलच्या 50 टक्के जागा रिक्त, आयटीकडे कल

नाशिक21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभियांत्रिकीत प्रवेश घेताना सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल या शाखांमध्ये प्रवेशासाठी बहुतांश विद्यार्थ्यांचा आेढा असताे. यंदा प्रवेशाच्या पहिल्या फेरीत मात्र या तीन अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल कमी राहिल्याने शासकीय तंत्रनिकेतनसह प्रत्येक महाविद्यालयांत ५० टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. दुसरीकडे आयटी व काॅम्प्युटर या शाखांच्या जागा पहिल्याच फेरीत १०० टक्के भरल्या आहेत.

पहिल्या कॅप राउंडमध्ये बहुतांश विद्यार्थ्यांना अलाॅटमेंट झाली असली तरी बेंटरमेंटचा पर्याय असल्याने अनेक विद्यार्थी दुसऱ्या कॅप राउंडच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे आता ६ सप्टेंबरला जाहीर होणाऱ्या दुसऱ्या अलाॅटमेंटकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहेत. पाॅलिटेक्निक डिप्लोमा प्रवेशासाठी केंद्रिभूत प्रवेशप्रक्रियेंतर्गत पहिल्या फेरीचे प्रवेश नुकतेच पूर्ण झाले असून सर्वाधिक विद्यार्थ्यांचा कल हा आयटी व काॅम्प्युटर या शाखांकडे राहिला. तंत्रनिकेतन महाविद्यालयात सर्वाधिक ९०० जागा उपलब्ध असून ६० % म्हणजेच ५०४ जागांचे प्रवेश पहिल्याच फेरीत पूर्ण झाले आहेत. तर खासगी महाविद्यालयांतील ४० ते ४५% जागांवरच पहिल्या फेरीत प्रवेश झाले आहेत. ३१ आॅगस्टला रिक्त जागांची माहिती जाहीर करण्यात आली. दुसऱ्या कॅप राउंडची प्रक्रिया सुरू झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...