आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन सादर:शिष्यवृत्तीचे राज्यात 50 हजार अर्ज निकाली,‎ नाशिकमध्ये 3600 अर्ज संस्थांकडेच प्रलंबित‎

नाशिक‎24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी‎ प्रोत्साहन म्हणून शासनाकडून मॅट्रिकोत्तर‎ शिष्यवृत्ती दिली जातो. त्यासाठी‎ महाविद्यालयांकडून अर्ज मंजूर होऊन ते‎ समाजकल्याण अधिकाऱ्यांकडे‎ ऑनलाइनच सादर केले जात असून गत‎ ३५ दिवसांत राज्यातील विविध‎ महाविद्यालयांकडून तब्बल ५० हजार‎ अर्ज समाजकल्याण विभागाकडे सादर‎ केले आहे. परंतू अद्यापही ७५ हजार‎ अर्ज महाविद्यालयांकडे प्रलंबित‎ असल्याचे उघड झाले आहे.

यात‎ नाशिकमधील ३६०० ्अर्जांचा समावेश‎ असून ते संबंधित संस्थांनी अद्यापही‎ सबमीट केले नाही. त्यामुळे या‎ विद्यार्थ्यांन शिष्यवृत्तीसाठी अडचण‎ हाेऊ शकते.‎ ‎ इयत्ता अकरावी ते पदव्युत्तर आणि‎ पीएच.डी.सह इतर तसेच सर्वच‎ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी‎ शासनाकडून एस.सी. अोबीसी आणि‎ आर्थिक दुर्बल या घटकांतील‎ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची योजना लागू‎ आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून‎ आॅनलाइन अर्ज सादर केले जातात. ते‎ अर्ज महाविद्यालयांच्या मंजूरीनंतर‎ समाजकल्याण विभागाच्या डेस्कला‎ येतात.

समाजकल्याण विभागाकडून‎ अर्ज मंजूर होऊन िवद्यार्थ्यांच्या थेट‎ खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम दिली‎ जाते. परंतू गत काही वर्षांपासून‎ महाविद्यालयांकडून हे अर्ज मंजूरीचे‎ काम अपेक्षेनुसार होत नाही.‎ नाशिकमध्ये एकूण १६ हजार नोंदणी‎ झाली आहे. ६ मार्चपर्यंत‎ समाजकल्याणने ११ हजार १२७ अर्ज‎ निकाली काढले. १ हजार अर्ज‎ विद्यार्थ्यांच्या लाॅगीनला असून, ३६००‎ अर्ज महाविद्यालयांकडेच आहेत. तर‎ ५०० अर्ज समाजकल्याणकडे आहे.‎ सहायय्क आयुक्त समाजकल्याण यांनी‎ सर्व महाविद्यालयांनी त्वरित अर्ज‎ निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...