आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहाेळी करिता गाेवऱ्या तयार करण्याच्या कामातून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बेरवळ, झंपावाडी, वाघचाैडा आणि हिवाळी या चार अतिदुर्गम आदिवासी पाड्यांवरील महिला आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल करीत आहेत. श्री गुरुजी रुग्णालयाच्या संकल्प सेवा समितीच्या उपक्रमातून या महिलांनी तयार केलेल्या ५० हजार गाेवऱ्या घराघरांत रास्त दरांत पाेहाचविण्यात आल्या. त्यातून या २४ महिलांना वर्षभर पुरेल इतका किराणा खरेदी करता येऊ शकणार आहे. संकल्प सेवा समितीकडून त्र्यंबकेश्वर आणि पेठ तालुक्यातील ५३ आदिवासी पाड्यांवर विविध विषयांवर काम केले जात आहे. त्यातच महिला सक्षमीकरणासाठी गाेवऱ्यांच्या माध्यमातून उत्पन्न ही याेजना पाच वर्षांपासून राबविली जात आहे.
हे पाडे इतके दुर्गम आहेत की येथे वाहन पाेहाेचणेही माेठ्या जिकिरीचे काम आहे. येथे जंगलात शेण गाेळा करून या महिला गाेवऱ्या तयार करतात. त्यांना सेवा समितीच्या वतीने गाेवऱ्या एका आकारातच तयार व्हाव्यात याकरिता साचे तयार करून दिले गेले. यामुळे सर्व गाेवऱ्या ७ इंच गाेलाकार आणि १ इंच उंचीच्या बनू लागल्या. त्या जागेवर खरेदी करून नाशिकमधील श्री गुरुजी रुग्णालयात आणल्या जातात, येथे ५० गाेवऱ्यांचे बाॅक्स बनतात आणि मागणीनुसार घरपाेचही केल्या जातात. यंदा या महिलांनी ७६ हजार गाेवऱ्या समितीला दिल्या त्यापैकी साेमवारी हाेळीच्या सायंकाळपर्यंत ५० हजार गाेवऱ्यांची विक्री झाली. उर्वरित गाेवऱ्या वर्षभर हाेम, पूजा विधी करता विक्री केल्या जाणार असल्याचे संकल्प सेवा समितीचे सेक्रेटरी डाॅ. राजेंद्र खैरे यांनी सांगितले.
गाेवऱ्यांसाठी केली १३ सेंटर्स
यंदा शहरातील विविध भागात १३ सेंटरवर समितीच्या स्वयंसेवकांनी या गाेवऱ्या विक्री केल्या. पाच रुपयाला एक याप्रमाणे ही विक्री केली गेली. गाेवऱ्या तयार करणाऱ्या महिलांना प्रत्येक गाेवरीकरिता २ ते २ .५ रुपये मेहनताना पडला. उर्वरित पैशामध्ये वाहतुकीसारखा खर्चाचा अंतर्भाव आहे. - मिलिंद जाेशी, समन्वयक, महिला सबलीकरण आयाम.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.