आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नाशिक महापालिका ॲक्शन मोडवर आली असून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करुन दिवसभरात सुमारे पाचशे कोरोना संशयित रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. यासोबतच ‘टेस्ट,ट्रॅक,ट्रीट’हा फॉर्म्युला वापरला जाणार असल्याचा निर्णय वैद्यकीय विभागाने घेतला आहे.
6 एप्रिल 2020 मध्ये नाशिक शहरामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर आत्तापर्यंत तब्बल या महामारीच्या तीन लाटा आल्या. आतापर्यंत 2 लाख 78 हजार लोकांना कोरोनाची लागण होऊन गेली असून त्यापैकी 4 हजार 150 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला.
कोरोनाची पहिली व दुसरी लाट भयावह ठरली होती. मात्र, प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढल्यामुळे ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटची तिसरी लाट सौम्य ठरली होती. मार्च महिन्यात दैनंदिन रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे केंद्र व राज्यसरकारने कोरोना संदर्भातील सर्व निर्बंध हटवले होते. त्यामुळे जवळपास महाराष्ट्र मास्क मुक्त झाले होते. मात्र, गेल्या काही दिवसांत राज्यातील रुग्ण संख्या वाढू लागली आहे. पुण्यात करोनाचा बी-5 हा नवीन व्हेरीयंट आढळला असून मुंबईतही रुग्णसंख्येत अचानक वाढ झाली आहे. नासिक मध्ये दिवसाला चार ते पाच रुग्ण वाढत असून यापूर्वीचा अनुभव बघता ही संख्या कित्येक पटीने वाढू शकते हे लक्षात घेत वैद्यकीय यंत्रणा सतर्क झाली आहे.
30 शहरी केंद्रात कोरोना तपासणी
गेल्या काही दिवसापासून कोरोना रुग्ण दिवसाला शुन्य इतके आढळत असल्यामुळे फारशी चिंता नव्हती. सर्दी, खोकला, ताप असे संशयित आढळले तर दिवसाला दिडशे ते दोनशे पर्यंत चाचण्या केल्या जात होत्या. मात्र आता या चाचण्या पाचशे ते सहाशे पर्यंत वाढविल्या जाणार आहेत. महापालिकेच्या डॉ.झाकीर हुसैन रुग्णालय ,बिटको रुग्णालयासह ३० शहरी आरोग्य केंद्रामध्ये कोरोना चाचण्यांची संख्या वाढवली जाणार आहे. रुग्णांसंख्या रोखण्यासाठी ‘टेस्ट,ट्रॅक,ट्रीट’हा फॉर्म्युला अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे.रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यां रुग्ण्यांच्या संपर्कातील रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पथके नियुक्त करण्यात आली आहे.
कोरोना चाचण्या पाचशेपर्यंत वाढवणार
महापालिकेचे वैद्यकीय अधिक्षक, डॉ.बापुसाहेब नागरगोजे म्हणाले, राज्यभरामध्ये कोरोना रुग्ण संख्या वाढत असून नाशिकमध्ये सध्या घाबरण्याचे कारण नाही. शहरात कोरोना रुग्णांची संख्या शुन्यापर्यंत खाली आली होती. मात्र, पुन्हा वाढल्यामुळे किमान दिवसाला पाचशे चाचण्या होतील. तसेच पालिकेच्या रुग्णालयांमध्ये येणाऱ्या सर्दी,खोकला तसेच तापाच्या रुग्णांचीही चाचणी केली जाणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.