आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाल्याचे बघून महापालिका ॲक्शन मोडवर आली असून संशयित रुग्णांची अर्थातच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग पाचशेपर्यंत वाढविण्याचा निर्णय वैद्यकीय विभागाने घेतला आहे. यासोबतच ‘टेस्ट, ट्रॅक, ट्रीट’हा फॉर्म्युला वापरला जाणार आहे. नाशिकमध्ये दिवसाला पाच रुग्ण वाढत असल्याने वैद्यकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. सर्दी, खोकला, ताप असे संशयित आढळले तर दिवसाला दोनशेपर्यंत चाचण्या केल्या जात होत्या. मात्र, आता या चाचण्या पाचशेपर्यंत वाढविल्या जाणार आहेत. डॉ. झाकीर हुसेन व बिटको रुग्णालयासह ३० आरोग्य केंद्रांमध्ये चाचण्या होतील.
चाचण्या वाढवणार.. ^राज्यभरामत कोरोना रुग्णसंख्या वाढत असून नाशिकमध्ये सध्या घाबरण्याचे कारण नाही. शहरात कोरोना रुग्णांची संख्या शून्यापर्यंत खाली आली होती. मात्र, ही संख्या वाढू लागल्याने किमान दिवसाला ५०० चाचण्या केल्या जाणार आहेत. पालिका रुग्णालयांमध्ये येणाऱ्या सर्दी, खोकला तसेच तापाच्या रुग्णांचीही चाचणी केली जाणार आहे. - डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक, मनपा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.