आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या 28 वर्षांपासून चेअरमन असलेल्या देविदास पिंगळे यांनी सुमारे 500 काेटी रूपयांचा भ्रष्टाचार केला. त्यांच्यावर लेखा परिक्षण अहवालात ठपके ठेवण्यात आले आहे. भ्रष्टाचारामुळेच तीन महिने तुरूंगात राहीलेल्या व्यक्तीची काय अब्रु असणार? अब्रु नसलेल्यांनी आम्हाला अब्रु नुकसानीचा दावा करण्याची धमकी देऊ नये. त्यांच्यावर उच्च न्यायालयात अजुनही खटला सुरूच असून त्यांनी दिशाभुल करणारी माहिती दिल्याचा आराेप माजी नगरसेवक दिनकर पाटील, बाजार समितीचे माजी चेअरमन शिवाजी चुंबळे व सुनील केदार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केला.
इडीकडे बाजार समितीच्या भ्रष्टाचाराची तक्रार करणाऱ्या पाटील यांच्यासह केदार व चुंबळे यांनी गुरूवारी शिवाजीनगर येथे संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पिंगळेंनी बाजार समितीत केलेल्या भ्रष्टाचाराचे आकडे प्रसार माध्यमांसमाेर मांडले. इडी कधीही खाेटी तक्रार दाखल करून घेत नाही. त्यांना तक्रारीत तथ्य वाटल्यामुळेच आमच्याकडे पुरावे मागितले हाेते. त्याबाबतचे पत्र आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही बाजार समितीत त्यांच्या संचालक मंडळाच्या कार्यकाळातील भ्रष्टाचाराचे 44 पुरावे सादर केले आहे. यामुळे पिंगळेंना माेठा झटका बसल्याने ते आमच्यावर बिनबुडाचे आराेप करत आहेत. सहकार खात्याच्या परवानगी शिवाय जमीन विकता येत नसतानाही त्यांनी बेकायदेशीर रित्या जमीन विकली आहे. हे प्रकरण देखील त्यांच्या अंगलट येणार आहे. सेंट्रल गोदावरी बँकेचे संचालक पद कायम असतानाही त्यांनी माझे पद गेल्याची दिशाभुल करणारी माहिती दिली असून त्यांच्यात हिम्मत असेल तर माझ्यासमाेर निवडणूक लढवावी असे आव्हानही पाटील यांनी दिले. बंॅक व साखर कारखान्यातही पिंगळेंचा भ्रष्टाचार सर्वश्रूत असल्याने अशा माणसाला काय अब्रु असणार, ज्यांना अब्रु नाही त्यांनी आम्हाला नैतिकतेचे धडे देऊ नये. चुंबळे कुटुंबियातील सर्वच सदस्यांच्या नावावर बँकेचे कर्ज आहे. हे कर्ज देखील चुकीच्या पध्दीतने घेतलेले असून आमच्या कुटुंबात एक रुपयाचा तरी भ्रष्टाचार पिंगळेंनी दाखवावा असे आव्हान बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंबळे यांनी दिले.
एक रुपयाही मानधन घेतले नाही
बाजार समितीत चेअरमन असताना, महापालिकेत नगरसेवक असताना व बँकेत संचालक असताना मी एक रुपयाही मानधन घेतलेले नाही. असे असतानाही मला पिंगळे यांनी संगनमत करून लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केल्याचेही चुंबळे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.