आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समन्वयाचा अभाव:दोन महिन्यांपासून आरटीओच्या 5000 आरसी, परवान्यांची परवड; अधिकारी म्हणतात काम व्यवस्थित सुरू, कागदपत्रे मात्र मिळेना

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयात मायक्रोप्रोसेसर चिप (केएमएस)ची अडचण निर्माण झाल्याने पाच हजारांवर आरसी बुक व परवाने वाहनचालकांना मिळालेच नाहीत. तसेच, पोस्टातील स्मार्टकार्ड पॅकिंग व आरटीओतील केएमसीच्या अडचणीमुळे परवाने पोहोचण्यासाठी दोन महिन्यांचा विलंब होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे . आरटीओने टपाल विभागाबरोबर केलेल्या करारामुळे परवाने आणि आरसी बुक नागरिकांना घरपोच मिळतात. त्यासाठी ५० रुपये शुल्क आकारले जाते. करारानुसार सात दिवसांत कागदपत्रे मिळणे आवश्यक आहे. मात्र, केवळ असमन्वयामुळे ते मिळण्यास दोन महिन्यांहून अधिक काळ लागतो. आरटीओमार्फत आरसी आणि परवान्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्यांची रवानगी मुख्य टपाल कार्यालयात होते.

त्यानंतर कागदपत्रे ग्राहक रहात असलेल्या परिसरातील टपाल कार्यालयात जातात. या ठिकाणी सर्व आरटीओकडून प्राप्त झालेल्या आरसी बुकचे लिफाफे बनवणे, पत्ता टाकणे आणि हे पाकीट पत्त्यावर पाठवण्याचे काम टपाल खात्याचे आहे. मात्र, काही दिवसांपासून आरटीओकडून आरसी बुक (स्मार्टकार्ड) आलेले नसल्याने पोस्टाला ते पाठविण्यास अडचणी येत त्याची संख्या आता पाच हजारांवर गेली आहे. तसेच, आरटीओतून परवाने मिळत नसल्याच्याही तक्रारी आहेत.

बातम्या आणखी आहेत...