आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्रामीण पोलिस दलात चालकपदाच्या १५ जागांसाठी ५०८ उमेदवार हजर झाले. ४५२ उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरले तर ५६ उमेदवार विविध कारणांसाठी अपात्र ठरले. विशेष म्हणजे चालकपदासाठी २ हजार ४३ उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता.
ग्रामीण पोलिस दलात शिपाईपदाच्या १६५ आणि चालकपदाच्या १५ जागांसाठी २ जानेवारीपासून भरती प्रक्रियेला प्रारंभ झाला. सोमवारी चालकपदासाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना बोलावण्यात आले होते. यातील ५०८ उमेदवार भरतीकरिता उपस्थित होते. ४५२ उमेदवार कागदपत्रे आणि उंची, छातीमध्ये पात्र ठरले. या उमेदवारांची १६०० आणि १०० मीटर धावणे, गोळाफेक चाचणी घेण्यात आली. यातील काही उमेदवारांची मंगळवारी चाचणी परीक्षा घेण्यात आली. नंतर शिपाईपदासाठी प्रथम अर्ज केलेल्या उमेदवारांना चाचणीकरिता बोलावण्यात येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.