आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाचा बळी:नाशकात कोरोनामुळे 51 वर्षीय पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू, आठ दिवसांपासून देत होते कोरोनाशी झुंज

नाशिकएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • मालेगावमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्या संपर्कात आल्याने झाली होती कोरोनाची लागण

नाशिकमध्ये कोरोनामुळे एका पोलिस कर्मचाऱ्याचा बळी गेला आहे. पाचशेपेक्षा अधिक रुग्ण असलेल्या मालेगावमध्ये कर्तव्य बजावताना आठवडाभरापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. जिल्ह्यातील कोरोनाचा हा 20 वा बळी असून जिल्ह्यात प्रथमच एका पोलिसाचा कोरोणामुळे मृत्यू झाला.  

नाशिक जिल्ह्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या मालेगावात कर्तव्य बजावत असलेल्या अनेक पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. याच पोलिसांच्या संपर्कात नाशिकमधील आडगाव परिसरातील धात्रकफाटा, कोणार्कनगर भागातील रहिवाशी असलेले 51 वर्षीय पोलिस कर्मचारी आले होते. 2 मे रोजी त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आल्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड कक्षात दाखल करण्यात आले होते. ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत असताना शनिवारी (9 एप्रिल) पहाटेपासून अचानक त्यांना श्वसनाचा त्रास होऊन शरिरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत गेले. त्यामुळे त्यांना व्हेंटीलेटवर ठेवल्यानंतर उपचाराला पुरेसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांची झुंज अपयशी ठरली व शनिवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.

शहरात दुसरा बळी

जिल्ह्यातील कोरोनाचा हा 20 वा बळी आहे. यापूर्वी मालेगावातील 18 तर नाशिक शहरातील एका गर्भवती महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. संबंधित पोलिस कर्मचारी नाशिक शहरातील रहिवासी आहे. शहरातील आज दुसऱ्या कोरोना बधिताचा मृत्यू झाला आहे.

शहरात आता 38 कोरोनाबाधित

मविप्र येथील शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेले 255 अहवाल शनिवारी (9 एप्रिल) सकाळी प्राप्त झाले. त्यात तब्बल 50 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यात मालेगावातील 49 तर नाशिक शहरातील एकाचा समावेश आहे. त्यामुळे नाशिक शहरातील कोरोना बाधितांची संख्या आता 38 इतकी झाली आहे. मविप्र मेडिकल कॉलेजमध्ये यापूर्वीचे दाखल असलेल्या शहरांमधील आणखी एकाला लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोणार्कनगर - 2 प्रतिबंधित क्षेत्र...

कोनार्कनगर येथील कोरोनाबाधित पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर कोणार्कनगर - 2 परिसर कंटेन्मेंट झोन अर्थात प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...