आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

51 वी आंतर जिल्हा टेबल टेनिस स्पर्धा:नाशिकच्या 19 वर्षाखालील मुलींच्या, महिला संघाला 2 सुवर्णपदके

नाशिक10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

19 वर्षाखालील खालील मुलींच्या गटाच्या अंतिम फेरीत नाशिकच्या संघाची गाठ मुंबईच्या द सबर्बन टेबल टेनिस असोसिएशनच्या संघाशी पडली. अत्यंत अटीअटीच्या झालेल्या सामन्यात त्यांचा 3-2 असा पराभव करून नाशिक संघाने सुवर्णपदक पटकावले. नाशिकच्या तनिशाने पहिल्या सामन्यात टीएसटीटीएच्या अनन्या चांदेचा 3-0 असा पराभव करून आपल्या संघाला 1-0 ने आघाडी मिळवून दिली.

दुसऱ्या सामन्यात सायलीने संपदा भीवणकर हीचा जोरावर 3-0 ने पराभव करून नाशिकला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. टीएसटीटीए मुंबईच्या मुक्ता दळवी हीने 3-2 असा पराभव करून आपल्या संघाला एक सामना जिंकून 1-2 अशी स्थिति निर्माण केली. चौथ्या सामन्यात मुंबई सबर्बनच्या संपदा भिवणकरने नाशिकच्या तनिशा कोटेचा हीचा 14-12, 4-11, 11-2, 13-11 असा 3-1 ने पराभव खळबळ उडवून दिली व आपल्या संघाला 2-2 अशी बरोबरी साधून दिली.

सायलीने टीएसटीटीए मुंबईच्या अनन्या चांदेचा असा 3-2 पराभव करून 19 वर्षाखालील मुलींच्या गटाचे सुवर्णपदक नाशिकला मिळवून दिले.महिला गटाच्या अंतिम फेरीत नाशिकच्या संघाची गाठ ठाण्याच्या महीला संघाशी पडली. तनिशा कोटेचा व सायली वाणी या दोन्ही खेळाडूंनी पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध करत महिला गटाचे अजिंक्यपद मिळवून देत दूसरे सुवर्ण पदक नाशिकला मिळवून दिले.नाशिकच्या टेबल टेनिस खेळाच्या इतिहासात प्रथमच दोन सुवर्ण पदक मिळवण्याचा मान मिळवून दिला. नाशिकच्या महिला संघात जान्हवी कळसेकर, अनन्या फडके तसेच 19 वर्षाखालील मुलींच्या संघात अनन्या फडके यांचाही समावेश होता.

नाशिकच्या पुरुष संघानेही या स्पर्धेत कांस्य पदक पटकावले. या संघात कुशल चोपडा, अजिंक्य शिंत्रे, पुनीत देसाई व धनंजय बर्वे यांचा समावेश होता.स्पर्धेचा बक्षीस समारंभ महाराष्ट्र राज्याचे क्रीडा संचालक सुहास दिवसे यांच्या हस्ते पार पडला. नासिक जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, जिल्हा संघटनेचे कोषाध्यक्ष राजेश भरवीरकर, प्रशिक्षक जय मोडक आदी उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...