आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • 5500 Teachers, Calligraphy Lessons To 10 Thousand Students; Art Teacher Sanjay Konturwar Implemented Activities In 8 Districts In 20 Years| Marathi News

शिक्षक दिन विशेष:5500 शिक्षक, 10 हजार विद्यार्थ्यांना सुलेखन धडे; ​​​​​​​कलाशिक्षक संजय कोंटुरवार यांनी राबवला २० वर्षांत ८ जिल्ह्यांत उपक्रम

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अध्ययनात मागे राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सुलेखनाद्वारे वाचनाची आवड रुजावी, या उद्देशाने निफाड तालुक्यातील कलाशिक्षक संजय कोंटुरवार यांनी सुरू केलेल्या सुंदर हस्ताक्षर उपक्रमात आतापर्यंत ५५०० शिक्षक व दहा हजार विद्यार्थ्यांनी सुलेखनाचे धडे गिरवले आहेत. त्यांच्या या उपक्रमामुळे वाचनातील गोडी वाढून विद्यार्थी आता स्वयंस्फूर्तीने अभ्यास करू लागले आहे. विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही या उपक्रमात सहभाग घेऊन प्रशिक्षण पूर्ण करत विद्यार्थ्यांमध्ये सुंदर हस्ताक्षराची कला रुजवत आहे.

गोदावरी माध्यमिक विद्यालयातील इयत्ता सहावीच्या बहुतांश विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर अवाचनीय असल्याचे लक्षात आल्यानंतर या विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुधारण्यासाठी शिक्षक संजय कोंटुरवार यांनी शाळेची सुटी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अतिरिक्त वेळ थांबवून हस्ताक्षर सुधारण्याचे प्रशिक्षण दिले. दोन महिने हा प्रशिक्षण उपक्रम राबविल्यानंतर वर्गातील सर्वच विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर अतिशय सुंदर झाले. विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरात झालेले बदल पाहून कोंटुरवार यांनी सुंदर हस्ताक्षर हा उपक्रम इतर विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. १९९६ पासून सुरू झालेल्या या उपक्रमात आतापर्यंत दहा हजार विद्यार्थ्यांनी सहभागी होत सुलेखनाचे धडे गिरवले आहेत. त्यांच्या या उपक्रमाने अनेक विद्यार्थ्यांनी दहावी व बारावीच्या परीक्षांत तसेच वेगवेगळ्या परीक्षांमध्ये चांगले गुण पटकावत उत्तुंग करिअरच्या दिशेने वाटचाल केली आहेत.

आठ जिल्ह्यांतील शिक्षक, विद्यार्थ्यांना प्रशिक्षण
कलाशिक्षक संजय कोंटुरवार यांनी निफाड तालुक्यातील शाळेतून सुरू केलेला सुंदर हस्ताक्षर उपक्रम गेल्या २० वर्षांत ८ जिल्ह्यातील ५५०० शिक्षक व १० हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे. त्यांच्या या उपक्रमाची दखल घेऊन कोंटुरवार यांना तालुका, जिल्हास्तरीय कला विषयक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

विद्यार्थ्यांना ‘स्व’त्वाची ओळख मिळाली
सुंदर हस्ताक्षराने अनेक विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने अभ्यास करू लागले. स्वत्वाची ओळख मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास बळावला. अभ्यासात एकाग्रता वाढली.
संजय कोंटुरवार, कलाशिक्षक

बातम्या आणखी आहेत...