आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐन शिक्षकदिनी महाविद्यालयीन शिक्षक करणार आंदोलन:5500 शिक्षक काळ्याफीती लावून करणार अध्यापन

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सलग दहा वर्षांपासून वारंवार आंदोलने करूनही शासनाकडून त्याकडे लक्ष दिले जात नसल्याने अखेर शिक्षक महासंघाने आंदोलनाचा पवित्रा घेत शिक्षक दिनीच शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काळ्याफिती लावून विद्यार्थ्यांना अध्यापन करणार आहेत.

प्रलंबित मागण्या मार्गी लावाव्यात, अशी मागणी महासंघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय शिंदे, सरचिटणीस प्रा. संतोष फाजगे, प्रा. अविनाश तळेकर यांनी केली आहे. मूल्यांकन पात्र घोषीत कनिष्ठ महाविद्यालय व तुकड्यांना प्रचलित निकषानुसार तातडीने व रोखीने अनुदान देण्यात यावे. सुरूवातीला शासनाकडून 20 टक्के आणि त्यानंतर 40 टक्के असे मुल्याकंनापुसार अनुदान देण्यात येत होते, त्यासाठी नियमही करण्यात आला, मात्र काही वर्षांपासून त्याच शासनाला विसर पडला असून आंदोलन करूनही त्याकडेा लक्ष दिले जात नाही. याप्रमुख मागणीबरोबरच वाढीव पदांना नियुक्ती दिनांकापासून मान्यता व वेतन देण्यात यावे. यासारख्मया प्रमुख मागण्याासाठी पाठपुरावा करूनही सरकार व संबंधित अधिकारी त्यास प्रतिसाद देत नाही.

यामुळे महासंघाने विविध टप्प्यांवर आंदोलन सुरू करण्याचा निर्णय नियामक मंडळाच्या बैठकीत घेतला आहे. या आंदोलनात शहर व जिल्ह्यातील 5500 शिक्षक सहाभगी होणार अहेत. आंदोलनाचा पहिला टप्पा 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळया फिती लावून संबंधित जिल्हाधिकारी यांचे मार्फत मागण्यांचे निवेदन सरकारला देण्यात येईल.

या आहेत मागण्या

आय. टी. (माहिती तंत्रज्ञान) विषय शिक्षकांना अनुदान व वेतन देण्यात यावे. दहा, वीस, तीस वर्षांच्या सेवेनंतरची आश्वासित प्रगती योजना कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना लागू करण्यात यावी. २००५ पूर्वीच्या व नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.ग रिक्त पदांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया राबवणे. एनपीएसमध्ये शिक्षकांना ऐच्छिक कपातीची परवानगी देण्यात यावी. कनिष्ठ महाविद्यालयीन तुकड्यांमधील विद्यार्थी संख्या शाळांना जोडली असल्यास 60 व स्वतंत्र किंवा कनिष्ठ महाविद्यालय संलग्न असल्यास 80 असावी.

पदावर वेतनश्रेणीत नेमणूक करावी

अर्धवेळ शिक्षकांना शालार्थमधून वेतन मिळण्याची तरतूद करावी. शिक्षण सेवकांचे मानधन वाढविण्यात यावे. पवित्र पोर्टलमध्ये अर्धवेळ नियुक्त शिक्षकांना त्याच महाविद्यालयात पूर्णवेळ पद निर्माण झाल्यास जानेवारी 2000 च्या आदेशानुसार पूर्णवेळ पदावर वेतनश्रेणीत नेमणूक करावी.

बातम्या आणखी आहेत...