आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाटप:शिवसेनेच्या 56 व्या वर्धापन; ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचे वाटप

सातपूर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त सातपूर कॉलनी येथील सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघाच्या सुमारे ५०० सदस्यांना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या हस्ते छत्री वाटप करण्यात आले. जाधव संकुल ग्रुपच्या वतीने माजी नगरसेवक नंदू जाधव व गाैरव जाधव यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मुलांवर संस्कार करण्याचे खरे काम ज्येष्ठ नागरिकच करतात. वयाची साठी ओलांडल्यानंतर केवळ नातवंडांमध्ये न रमता अनेकजण कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असतात. ही अभिमानास्पद बाब असून पावसापासून त्यांचा बचाव व्हावा यासाठी शिवसेनेतर्फे यंदा छत्र्यांचे वाटप करण्यात आल्याचे बडगुजर यांनी सांगितले.

पावसाळा आणि उन्हाळ्यात आम्हाला ही छत्री निश्चितच उपयोगी पडेल. शिवसेनेने दिलेली भेटवस्तू आमच्यासाठी लाखमोलाची असल्याचे ज्येष्ठ अध्यक्ष किसन खताळे यांनी सांगितले. यावेळी अलका गायकवाड, विजय बुरकुल, शंकर पाटील, नाना वाघ, बाळा गवळी, प्रकाश गिर, भगवान रायते, सुखदेव आंधळे,बन्सी रायते, भिका सोनवणे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...