आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्राचा निधी खर्च करण्यास स्थानिक प्रशानाला अपयश:2 वर्षापूर्वी मिळाले होते 570 कोटी, केवळ खर्च केले 246 कोटी

नाशिक25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारने 15 व्या वित्त आयाेगाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या ग्रामीण विकास यंत्रणेला दाेन वर्षात 570 काेटी रुपयांचा निधी दिला हाेता. मात्र या निधी पैकी केवळ 246 काेटी रुपयेच खर्च झाला असून 326 काेटी रुपयांचा निधी खर्च करण्यास प्रशासनास अपयश आले आहे. त्यामुळे 2022-23 च्या 250 काेटी रुपयांच्या निधीपासून ग्रामीण विकास यंत्रणा वंचित आहे.

15 व्या वित्त आयाेगाच्या निधीतून ग्रामीण भागात मंजुर असलेल्या 570 काेटीच्या निधीतून फक्त 246 काेटी रुपये खर्च केले आहेत. मंजुर असलेल्या कामातून अर्ध्याहून अधिक कामांना अर्थातच 3 हजार कामांना अद्याप सुरूवात झालेली नाही. त्यामुळे निधी खर्चाचे उपयाेगीता प्रमाणपत्र सादर करण्यास ग्रामीण यंत्रणेला अडथळा येत असल्याने सुमारे 250 काेटी रुपयांच्या निधीपासून वंचित राहण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून जिल्ह्याच्या एकूण निधीतून ग्रामपंचायतींना 80 टक्के निधी व जिल्हा परिषद पंचायत समित्यांना प्रत्येकी 10 टक्के निधी दिला जातो. हा निधी खर्च करण्याबाबत सरकारने बंधीत व अबंधित कामांची विभागणी केली आहे. त्यानुसार अबंधित निधीतून मूलभूत सुविधांची कामे केली जातात, तर बंधित निधीतून पाणी पुरवठा व स्वच्छतेची कामे करण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. निधी खर्चाचे नियाेजन करून उपयाेगीता प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय नवीन निधी मिळणार नसल्याने निधी खर्चाचे नियाेजन करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेची धावपळ सुरू आहे.

वित्त आयोगाचा निधी खर्च करण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांना स्वतंत्र मार्गदर्शन सूचना दिलेल्या आहेत. केंद्र सरकारने 15 वा वित्त आयोगातून निधी देण्यास 2020 पासून सुरुवात केली. यापूर्वीच्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना थेट निधी दिला, मात्र, यावेळी त्यात बदल करून निधीच्या 20 टक्के निधी पंचायत समित्या व जिल्हा परिषद यांना समप्रमाणात देण्यात येत आहे. या निधीच्या नियोजनासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर विकास आराखडा तयार करणे बंधनकारक असून या आराखड्यातील कामेच या निधीतून करणे अपेक्षित आहे.

बातम्या आणखी आहेत...