आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोविड मुळे जगभरात लाॅकडाऊन लागल्याने युरोप विथ लेक लुगानी या टुर्स करीता भरलेले 4 व्यक्तींचे 6 लाख 51 हजार रुपये परत देण्यास नकार देणाऱ्या मुंबई स्थित टुर्स अॅण्ड कंपनीला ग्राहक न्यायालयाने दणका दिला. बुकींग केलेली सर्व रक्कम व्याजासह परत देण्याचे आदेश दिले. ऑक्टोंबर 2019 मध्ये टुर बुक करण्यात आली होती.
ग्राहक न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार, कैलास पाटील रा. काॅलेज रोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मुंबई येथील एका टुर्स अँण्ड कंपनीचे गंगापूरोडवर कार्यालय आहे. येथे दि. 23 ते 2 मे 2020 याकालावधीसाठी आयोजीत गिलम्स ऑफ युरोप विथ लेक लुगान या टुरसाठी 4 व्यक्तींसाठी 9 ऑक्टोंबर 2019 रोजी 6 लाख 51 हजार रुपये भरले होते. या काळात जगात लाॅकडाऊन सुरु झाल्याने यात्रेसाठी भरलेली रक्कम परत देण्याची विनंती केली. मात्र संबधित कंपनीने रक्कम देण्यास टाळाटाळ करत कार्यालयात बोलवून भविष्यात टुर्ससाठी 5 लाख 72 हजारांचे क्रेडीट शेल सर्टिफिकेट तयार करुन दिले. पाटील यांनी नकार दिला. कंपनीने पैसे देण्यास नकार दिला. पाटील यांनी ग्राहक न्यायालयात तक्रार केली होती.
न्यायालयाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्य सचीन शिंपी, प्रेरणा साळुंखे यांनी कंपनीचे वकिल आणि पाटील यांच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकून घेतला. दोन्ही पक्षांचा युक्तीवाद एकुन घेत कंपनीने ग्राहकाला क्रेडीट शेल सर्टिफिकेट देऊन भविष्यात त्यांच्याच टुर कंपनीत ते वापरण्याची जबरदस्ती केलेली आहे. अशा प्रकारे कंपनीने अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करुन तक्रारदारांना सेवा देण्यास कमतरता केलेली आहे. हा प्रकार असंवेदनशिलता दर्शवणारा असल्याचे मत मंचाने व्यक्त केले. मंचाने संबधित कंपनीला तक्रारदार यांना 6 लाख 51 हजार रुपये 9 ऑक्टोंबर 2020 पासून ते प्रत्यक्ष रक्कम हाती मिळेपर्यंत 10 टक्के व्याजासह अदा करण्याचे आदेश दिले. पाटील यांच्यावतीने अॅड. सुमेघा कुलकर्णी यांना युक्तीवाद केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.