आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सिमेंटचे 6 मॉडेल रोड उभारणार, खोदकाम टळणार ; पालिका आयुक्त पवार यांचा अभिनव प्रयोग

नाशिक21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोट्यवधी रुपये खर्च करून दरवर्षी किरकोळ कारणास्तव रस्ते खोदले जात असल्याचे बघून पालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी मलवाहिका, इलेक्ट्रिक केबल, गॅस पाइपलाइन, कॅचपिट, फुटपाथचा समावेश असलेले माॅडेल राेड शहरातील सहा विभागात तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात त्यासाठी १८ मीटरपेक्षा अधिक रुंद असलेले रस्त्यांची निवड केली जाणार आहे. शहरात गेल्या काही वर्षांमध्ये नवीन रस्ते तयार करा व महिना दोन महिन्यांच्या अंतरावर त्यावर खोदकाम करा, असे नवीन सत्र सुरू झालेले आहे. मोबाइल, इंटरनेट, घरगुती गॅस, वीज व पाणी जोडणी तसेच नानाविध कारणांसाठी केबल टाकण्याच्या कारणास्तव रस्ते खोदले जात आहे. काही ठिकाणी रस्ते खोदकामाचा बदल्यांमध्ये महापालिकेला डॅमेज चार्जेस भरले जातात. मात्र, या माध्यमांमधून मिळणाऱ्या निधीतून संबंधित रस्त्यांची व्यवस्थित देखभाल दुरुस्ती होत नसल्यामुळे कालांतराने संपूर्ण रस्त्याला खड्डे पडून त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेत पालिका आयुक्त पवार यांनी आपला मुंबई महापालिकेतील कामकाजाचा अनुभव वापरून शहरांमध्ये पहिल्या टप्प्यात सहा मॉडेल रोड तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. हे रस्ते सिमेंटचे असणार असून त्यावर प्रत्येक तीस मीटरवर क्रॉसिंग पॉइंट राहणार आहे.

{रस्ता कोठेही खोदण्याची गरज पडू नये यासाठी प्रत्येक ३० मीटर अंतरावर क्रॉसिंग पॉइंट असणार आहे. {ट्रॅफिक डिव्हायडरसह रस्त्याच्या मधोमध सुशोभीकरणासाठी जागा सोडण्यात येणार आहे. {पाणीपुरवठा, मलनिस्सारण, भुयारी गटारीच्या स्वतंत्र अंडर लाइन्स राहणार आहेत. {रस्त्याच्या आजूबाजूचे पाणी वाहून जाण्यासाठी कॅचपिटची व्यवस्था असणार आहे. {इलेक्ट्रिक केबल, गॅस पाइप-लाइनसाठी स्वतंत्र व्यवस्था राहील. {तसेच १८ मीटरपेक्षा मोठा रस्ता असल्यास त्या ठिकाणी स्वतंत्र सायकल ट्रॅकची व्यवस्था केली जाणार आहे.

सर्व सुविधांयुक्त रस्ते मिळणार ^कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेला रस्ता पुन्हा पुन्हा खोदल्यास त्याचा दर्जा रहात नाही. त्यामुळे रस्ते खोदण्याची गरज पडणार नाही, असे सर्व सुविधांयुक्त सहा स्वतंत्र मॉडेल रोड विकसित केले जातील. सहा विभागात १८ मीटरपेक्षा अरुंद रस्त्यांचे सर्वेक्षण केले जाईल. - रमेश पवार, आयुक्त, मनपा

बातम्या आणखी आहेत...