आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी १ एप्रिल २०१८ नंतर अस्तित्वात येणाऱ्या मिळकतींना जबरी करवाढीच्या खाईत लोटल्यानंतर तब्बल चार वर्षानंतरही त्यापासून दिलासा देण्यास राज्य शासन चालढकल करत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू असून त्यांनी स्पष्टपणे पालिकेतील तत्कालीन सत्ताधारी भाजपाने महासभेच्या माध्यमातून करवाढ रद्द करण्याबाबत केलेल्या ठरावाच्या अनुषंगाने काय कारवाई करणार अशी विचारणा केलेली आहे.
हा ठराव विखंडित झाल्यास नाशिककरांना जाचक करवाढीतून मुक्तता मिळण्याची चिन्हे आहेत. तत्कालीन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी १९ जुलै २०१९ राेजी महासभेने करवाढ रद्द करण्याचा केलेला ठराव २५ जानेवारी २०२० राेजी विखंडनासाठी पाठवला. या ठरावावर सहा महिन्यापेक्षा अधिक काळ उलटूनही कारवाई न झाल्याने तो रद्द करणे अपेक्षित आहे. टळणार आहे.
व्यवसाय थंडावले ; भाड्याने दुकाने घेऊन खिसा खाली
व्यावसायिक इमारत भाडेतत्त्वावर घेतल्यास त्यास वाणिज्य वापर मूल्यांकन दर ७९.२० रु. प्रति चौ.मी . दरमहा दराच्या तिप्पट म्हणजेच २३७.६० रु. प्रति चौ. मी. प्रति महिना याप्रमाणे अवास्तव मालमत्ता कर लागू होतो. ही करवाढ व्यावसायिक इमारतीचे मालक व भाडेतत्त्वावरील व्यावसायिकांना परवडत नाही. परिणामी दुकाने भाड्याने घेऊन व्यवसाय करणे अशक्य झाले आहे. ज्यांच्याकडे दुकान घेण्याची एेपत नाही नाही त्यांना रोजगारासाठी रस्त्यावर यावे लागत आहे.
भाजप, शिंदे गटाने ठरवलं तर शहरवासीयांना चुटकीसरशी मिळणार करमाफी
२०१८ पासून करवाढीविराेधात सुरू असलेला लढा तब्बल चार वर्षानंतर निर्णायक टप्प्यात आली आहे. २७ आॅक्टाेंबर २०२० राेजीच अंतिम निर्णय अपेक्षित हाेता मात्र त्यावर केराेनामुळे सुनावणी झाली नाही. दरम्यान, जादा दराने कर आकारणीच्या नाेटिसा नाशिककरांना आल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यामध्ये झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने राज्य शासनाला पुन्हा एकदा ठराव संदर्भात काय कारवाई करणार अशी विचारणा केली आहे. शासनाने ठरवले तर महासभेचा ठराव अमलात येऊ शकेल अर्थातच त्याचा दुसरा अर्थ म्हणजे गमेंनी पाठवलेला विखंडनाचा ठराव फेटाळावा लागेल. त्यासाठी भाजप व शिंदे गटाला सत्तेचा उपयोग करून कारवाई करावी लागेल.
निर्णय राज्य शासनाकडे
जवळपास गेल्या अडीच वर्षापासून मनपाने केलेली नियमबाह्य करवाढ रद्द करण्यासंदर्भात न्यायालयीन लढाई सुरू असून आता राज्य शासनाला महापालिकेने पाठवलेल्या ठरावावर काय कारवाई करावी या संदर्भात उच्च न्यायालयाने विचारणा केलेली आहे. राज्य शासनाने महासभेचा निर्णय कायम करून पालिकेचा ठराव विखंडित न केल्यास करवाढीमधून दिलासा मिळू शकतो.- अॅड. संदीप शिंदे
शिंदे गटाला बैठकीतच रस ; कारवाई मात्र नाही
यापूर्वी शिंदे गटाने दोन ते तीन बैठका घेतल्या आहेत. सर्वप्रथम पालकमंत्री दादा भुसे यांनी दोन बैठका घेत करवाढीतून सुटका करण्याचे नाशिककरांना आश्वासन दिले होते. त्यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे खा. हेमंत गोडसे यांनी घेतलेल्या बैठकीतही करवाढ माफ करण्यासंदर्भात कारवाई होईल, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे झालेल्या बैठकीत त्यांनी कारवाढ रद्द करण्याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.