आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गणेश विसर्जन:जवानासह ६ जणांचा गणेश विसर्जन करताना बुडून मृत्यू,नाशिक तालुक्यातील सर्वाधिक २ जणांचा समावेश

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा गणेश विसर्जन करताना जिल्ह्यात लष्करी जवानासह ६ जणांचा वेगवेगळ्या घटनांमध्ये पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. त्यातील चार जणांचे मृतदेह पण्याबाहेर काढण्यात स्थानिक पथक आणि नागरिकांना यश आले असून दोन जणांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे.

मृतांमध्ये सर्वाधिक २जण हे नाशिक तालुक्यातील असून, देवळा येथील प्रशांत गुंजाळ हे सैनिकी जावान आहे. त्रिम्बकेश्वर, सिन्नर, निफाड येथील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मृतांचा तापशील-

देवळा, लष्करी जावान

प्रशांत वसंत गुंजाळ (वय २८), विहिरीत बुडून मृत्यू झाला. स्थानिक बचाव पथकाने मृतदेह बाहेर काढला आहे. नाशिक तालुका -

नरेश नागेश कोळी (वय.४०) राहणार देवलाली हे वालदेवी नदीपात्रात पडून मृत झाले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

- अजिंक्य राजाराम गायधनी (वय 21)दारणा नदीत, दारणा संघम येथे बुडाला आहे. मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे. त्रिंबक तालुका -

शिवराम सोमा निंबारे,बेरवेळ हाट्टी पाडा पाझर तलावात बुडाला आहे.

निफाड तालुका

रविंद्र (टिपू) रामदास मोरे, पिंपळगाव बसवंत, कादवा नदी बुडुन मृत्यू झाला. मृतदेह पाण्यातून बाहेर काढला आहे. सिन्नर तालुका-

ओमकार काकड (वय १४) म्हाळुंगी नदी पात्रात बुडून मृत्यू झाला. मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे.