आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिककरांचेच नव्हे तर देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आणि नाशिककरांची जीवनवाहिनी असलेल्या गाेदावरीचे प्रदूषण राेखण्यासाठी उच्च न्यायालयाने ४२ हून अधिक आदेश दिल्याचे महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळार स्पष्ट दिसत असतानाही गाेदावरीचे प्रदूषण मात्र कायम आहे. सांडपाण्यापेक्षा शहरातील सहा ठिकाणी असलेल्या जुन्या मलजल केंद्रांमध्ये प्रक्रिया झालेले पाणी गाेदावरीत साेडण्यात येत असल्याने या प्रदूषणात दिवसेंदिवस भरच पडत आहे. जुने मलजल प्रकल्प अद्ययावत करण्यासाठी मनपाला केंद्राकडून येणाऱ्या निधीचीही प्रतीक्षा आहे.
७० ते ७५ ठिकाणी मिक्सिंग आढळले
गाेदावरीत साेडण्यात येणाऱ्या पावसाळी नाल्यांनाच सांडपाणी वाहून नेणारे नाले जवळपास ७० ते ७५ ठिकाणांवर जाेडण्यात आल्याचे पालिकेच्याच पथकाच्या पाहणीत उघडकीस आले आहे.
दोनच केंद्र अद्ययावत
गंगापूर व पिंपळगाव खांब या दाेनच ठिकाणी अद्ययावत मलजल शुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहेत. तपाेवन, टाकळी व दसक-पंचक या ठिकाणी असलेले सहा मलजल शुद्धीकरण केंद्र जुनेच आहेत.
ऑडिट करण्याच्या आदेशांकडेही दुर्लक्ष
मलजल केंद्रांमध्ये दूषित पाण्यावर व्यवस्थित प्रक्रिया हाेते की नाही याबाबतचे ऑडिट करण्याचे आदेश तत्कालीन अधिकारी महेश झगडे यांनी दिले हाेते. जुन्या मलजल प्रकल्पातून गाेदावरीत प्रक्रिया करून साेडण्यात येणाऱ्या लाखाे लिटर पाण्यामुळे गाेदावरी अधिक प्रदूषित हाेत असल्याचा आराेप गाेदाप्रेमी राजेश पंडित यांनी केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.