आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थी पळून गेल्याची घटना:मनमाड बालसुधारगृहातून पळून गेलेले 6 विद्यार्थी पुन्हा ताब्यात

मनमाड5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील कॅम्प विभागात असलेल्या बालसुधारगृहातून सहा विद्यार्थी पळून गेल्याची घटना घडली, मात्र कर्मचाऱ्यांनी या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले असून याबाबत पोलिस स्थानकात माहिती देण्यात आली आहे. मनमाडच्या बालसुधारगृहामध्ये कडक सुरक्षा व्यवस्था असताना देखील येथे ठेवण्यात आलेले विद्यार्थी येथून पळून जाण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.

शहरातील कॅम्प विभागात असलेले बालसुधारगृहात अल्पवयीन असलेल्या विद्यार्थ्यांना दाखल करण्यात येते. या सुधारगृहातील सहा अल्पवयीन विद्यार्थी गेल्या दोन दिवसापूर्वी पळून गेले होते. याबाबत पोलिस प्रशासनाला माहिती दिल्यानंतर बालसुधारगृह कर्मचाऱ्यांनी या सहा विद्यार्थ्यांची शोधमोहीम सुरू केली होती.

नाशिक परिसरात शोध घेतला असता शोधमोहिमेदरम्यान ही सहा मुले आढळून आले. या सहा मुलांमधून तीन विद्यार्थ्यांना नाशिक येथे ठेवण्यात आले असून उर्वरित तीन विद्यार्थ्यांना मनमाड येथील बालसुधारगृहामध्ये आणण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी याच बालसुधारगृहातून चार बाल आरोपी फरार झाल्याची घटना घडली होती.

बातम्या आणखी आहेत...