आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियान:6 हजार कि.मी. प्रवासातून स्वच्छतेचा संदेश‎

इंदिरानगर‎20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘स्वच्छ भारत, हरित भारत’ असा संदेश‎ देत नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे‎ सात सदस्य सहा हजार किलाेमीटरच्या ‎प्रवासास निघाले आहेत. उद्या साेमवारी‎ प्रवास पूर्ण हाेईल. चंद्रकांत नाईक, रवींद्र ‎ दुसाने, रमेश धोत्रे, अनिल वराडे, मोहन ‎ ‎ देसाई, संजय कुलकर्णी यांनी मुंबई,‎ चेन्नई, कोलकाता, दिल्ली व परत मुंबई‎ असा प्रवास करून ‘स्वच्छ भारत, हरित‎ भारत’ हे अभियान घेऊन १७ फेब्रुवारी‎ राेजी गेट वे ऑफ इंडिया येथून प्रवासाला‎ सुरुवात केली.‎

दिल्ली येथे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी‎ यांची भेट घेत त्यांना उपक्रमाबद्दल माहिती‎ देण्यात आली. दिल्ली येथे महाराष्ट्र‎ परिचय केंद्रासदेखील भेट देऊन‌‎ सायकलिस्टने मोहिमेची माहिती दिली.‎ जयपूर, अजमेर, उदयपूर,ब डोदा यामार्गे‎ साेमवारी ( दि. ६) गेट वे ऑफ इंडिया‎ येथे हा प्रवास पूर्ण हाेईल. संपूर्ण प्रवासात‎ ठिकाणी सायकलिस्टने लोकांशी संवाद‎ साधला व ‘स्वच्छ भारि, हरित भारत’ या‎ अभियानाची माहिती दिली.‎

बातम्या आणखी आहेत...