आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

60 दिवसात नाशकात राष्ट्रवादीच ‘पुन्हा':ठाकरे गटालाही शिंदे गटाने दिली टस्सल; भाजपने राखला दुसरा क्रमांक

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्यापार्श्वभुमीवर लिटमस टेस्ट मानल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील 196 ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधीक 63 सरपंचांच्या जागा जिंकत राष्ट्रवादीने पहिला क्रमांक मिळवला आहे. 18 ऑक्टाेंबर राेजी जिल्ह्यातील 190 ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर त्यात, राष्ट्रवादीने जागा मिळवत पहिला क्रमांक घेतला हाेता.

त्यामुळे ग्रामीण भागात राष्ट्रवादीचा फिव्हर कायम असून त्याखालाेखाल भाजपाने दुसरा क्रमांक राखला आहे. दरम्यान, मागीलवेळी एकही खाते उघडू न शकलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाने टस्सल देत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्याबराेबरीने जाण्याचा प्रयत्न केला. उद्धव गटाला 28 तर शिंदे गटाचे 22 सरपंच निवडून आले.

राज्यात जून महिन्यात ऐतहासिक सत्तांतरण झाल्यानंतर शिंदे यांची शिवसेना व भाजप यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. शिंदे गटाने जाेरदार माेहीम राबवत उद्धव ठाकरे गटातील महत्वाचे माेहरे आपल्या गळाला लावत संघटना मजबूत केली आहे. त्याचे परिणाम आता दिसू लागले असून गेल्या 60 दिवसात दाेन टप्प्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाचा वरचष्मा दिसून आला आहे. खासकरून ठाकरे गटाला त्यांच्याकडून टस्सल दिली जात असून त्यामुळे शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या महत्वकांक्षा वाढत चालल्या आहेत.

अजित पवारांच्या मंत्रामुळे राष्ट्रवादीची सरशी

जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत.पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाच्यादिवशी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारांनी स्वत:पुरता विचार न करता मतदारसंघातील ग्रामपंचायतीपासून प्रत्येक निवडणुकीत स्वत:ची कामगिरी दाखवून द्यावी असे आवाहन केले हाेते. तसेच माजी पालकमंत्री छगन भुजबळ हे कशापद्धतीने आपल्या जिल्ह्यात जास्तीजास्त आमदार निवडून आणतात याचाही दाखला दिला हाेता. ग्रामपंचायत निवडणुकीच्या कामगिरीची नाेंद आमदारांच्या प्रगती पुस्तकात हाेत असल्याचे बघून त्यांनी ताकद लावली. त्यामुळे राष्ट्रवादीला प्रभाव वाढवता आला.

दहा टक्के अपक्षांना पसंती

196 जागांपैकी 20 जागी अपक्ष सरपंच निवडून आले असून त्यामुळे एकुण दहा ठिकाणी अपक्षांच्या हाती झेंडा आल्याचे चित्र आहे. दरम्यान, ज्या भागात ज्या पक्षाचे सदस्य अधिक, त्यांच्याकडून ग्रामपंचायत सरपंचाला आपल्या गटात खेचण्यासाठी कसरत सुरू झाली आहे.

भुजबळांकडून 75 टक्के जागा जिंकल्याचा दावा

छगन भुजबळ यांचा येवला विधानसभा मतदारसंघ असून त्यातील 113 ग्रामपंचायत सदस्यांपैकी 85 राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य निवडून आल्याचा दावा त्यांनी केला. मतदारसंघात 13 सरपंचापैकी राष्ट्रवादीचे 7, ठाकरे गटाचे 3, शिंदे गटाचे 1 व अन्य 2 सरपंच निवडून आल्याचेही त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...