आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मालेगाव:कोरोना लढ्यात मृत पाेलिसांच्या वारसांना प्रत्येकी 60 लाखांची मदत

मालेगाव10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्य सरकारकडून 50 तर पोलिस दलातर्फे 10 लाखांची मदत

काेराेना लढ्यात कर्तव्य बजावताना बाधित होऊन बलिदान दिलेल्या दोन पाेलिस कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ६० लाखाची मदत देण्यात आली. पाेलिस अधीक्षक डाॅ. आरती सिंह यांच्या हस्ते धनादेश प्रदान करण्यात आले.

काेराेनाचे हाॅटस्पाॅट ठरलेल्या मालेगाव शहरात काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी माेठ्या प्रमाणावर पाेलिस बंदाेबस्त तैनात करण्यात आला आहे. या लढ्यात कर्तव्य बजावणाऱ्या शेकडाे पाेलिस कर्मचाऱ्यांना काेराेनाची लागण झाली हाेती. यातील बरेच कर्मचारी काेरानामुक्त हाेत पुन्हा कर्तव्यावर हजर झाले. तर हवालदार दिलीप भास्कर घुले, भाऊसाहेब एकनाथ माळी व साहेबराव झिप्रू खरे या कर्मचाऱ्यांचा काेराेनामुळे दुर्दैवी अंत झाला हाेता. कर्तव्य बजावताना मृत झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांनी ५० लाखांची मदत देण्याची घाेेषणा राज्य सरकारने केली हाेती. तर पाेलिस दलातर्फे दहा लाख रुपयांची विमा रक्कम देण्याचे घाेषित करण्यात आले हाेते. त्यानुसार घुले व माळी यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ६० लाखांचा धनादेश देण्यात आला. खरे यांच्या कुटुंबीयांनाही लवकरच मदतीचा धनादेश दिला जाणार असल्याची माहिती पाेलिस अधीक्षक डाॅ. आरतीसिंह यांनी दिली. डाॅ. सिंह व अपर पाेलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

पोलिस कर्मचाऱ्यांच्या बलिदानाला सलाम

काेराेना लढ्यात आपल्या जिवाची बाजी लावून बलिदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा नाशिक ग्रामीण पाेलिस दलास सार्थ अभिमान आहे. काेराेनाच्या अदृश्य शत्रूचा सामना करताना आलेले वीरमरण सदैव स्मरणात राहील. संपूर्ण पाेलिस दलाचा शहीद कर्मचाऱ्यांच्या कार्याला सलाम आहे. - डाॅ. आरती सिंह, पाेलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण

बातम्या आणखी आहेत...