आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादोन वर्षांपासून कोरोना निर्बंधांच्या जोखडात अडकून पडलेल्या नाशिककरांना पाडव्याच्या मुहूर्तावर मोकळा श्वास घेण्याची संधी मिळाली अन्, त्यापूर्वीच शहरवासीयांनी त्याचा अनुभव रंगपंचमीच्या माध्यमातून घेतलाही. आता शहरवासीयांना दुसरी खुशखबर म्हणजे यंदा उन्हाळा तीव्र जाणवत असला तरीही गंगापूर धरणासह समूहात मुबलक आणि भरपूर पाणी आहे. तब्बल ६० टक्के साठा सध्याच्या स्थितीत उपलब्ध असून, गेल्यावेळच्या तुलनेत तो ११ टक्के जास्त आहे. म्हणजे यंदा कुठेही पाणी कपातीची वेळ नाशिकरांवर येणार नसून सर्व सण-उत्सव अगदी धुमधडाक्यात साजरे करता येतील. शहरवासीयांची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणात आजच्या स्थितीत ५५ टक्के पाणी आहे. गेल्यावर्षी याच वेळी ते ४७ टक्के इतकेच होते म्हणजे तब्बल ८ टक्के कमी पाणी होते. शिवाय कोरोना निर्बंध असल्याने शासकिय व निमशासकीय कार्यालये, इतर आ स्थापनांवरही निर्बंध होते. त्यामुळे बहुतांश मंडळी घरूनच काम करत असल्याने पाण्याचा वापरही अधिक होता. यंदा सारे काही खुले झाले आहे. अन् पाणीही मुबलक आहे. गंगापूरसमूहाचा विचार केला तर आजच्या स्थितीत ६ हजार १०३ दलघफू म्हणजे ६० टक्के साठा आहे. तो गेल्यावेळी ४ हजार ९४३ दलघफू म्हणजे ४९ टक्के होता. यंदाच्या साठ्याच्या तुलनेत जवळपास १२०० दलघफू कमी होता. यावेळी पाण्याची चिंता राहणार नसल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.