आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:आडगावला 61  किलो गांजा जप्त; दाेघे ताब्यात

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आडगावला गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने जाधव मळा मुंबई आग्रारोड येथे गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली. रशीद गुलाब मन्सुरी रा. माळी गल्ली पिंपळगाव बसवंत, प्रतीश आनंदा जाधव रा. जाधव मळा आडगाव यांना ताब्यात घेतले.

पोलिसांच्या माहितीनुसार, महामार्गावर ट्रक चालकांना गांजा विक्रीची माहिती पथकाचे विशाल काठे यांना मिळाली. पथकाने जकात नाका परिसरात सापळा रचला. एमएच ४६ एक्स ५०५२ या कारमधून एमएच ०२ बीडी ९०५२ मध्ये दोघे जण पोते ठेवत असल्याचे निदर्शनास आले. पथकाने दाेघांसह दाेन्ही कार आणि ६१ किलो गांजा असा १४ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. संशयितांच्या विरोधात आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ, विष्णू उगले, रवींद्र बागुल, किरण शिरसाठ यांच्या पथकाने ही कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...