आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतिहास कालीन घोडेबाजार:येवल्यातील घोडेबाजारात उदयपूरच्या घाेडा वंशातील एका घाेडीला 61 लाखांची बाेली

येवला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुमारे ३०० वर्षांपासून सुरू असलेला कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारच्या आठवडे बाजाराच्या दिवशी भरणाऱ्या घोडे बाजाराला आज हजारांवर अश्वप्रेमींनी घोडे विक्रीसाठी आणले. आजच्या बाजाराचे वैशिष्ट्य म्हणजे उदयपूरच्या राजेशाही घराण्यातील वापरलेल्या घोड्यांचा वंश असलेल्या एका घोडीची किंमत तब्बल ६१ लाखापर्यंत लावण्यात आली असल्याची माहिती या घोडीच्या मालकाने दिली आहे. येवल्याचा घोडेबाजार हा इतिहास कालीन घोडेबाजार असून सुमारे ३०० वर्षांपूर्वी शहराचे संस्थापक राजे रघुजी बाबा शिंदे यांनी शहर बसवल्यानंतर या घोडेबाजाराला सुरुवात केली होती. या घोडेबाजारात देशभरातील पंजाब, हरियाणा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश आदींसह इतर राज्यांच्या कानाकोपऱ्यातून घोड्याचे व्यापारी व खरेदीदार दर मंगळवारी आठवडे बाजाराच्या दिवशी बाजार समितीच्या आवारात येतात. पाच लाखांपासून ते पन्नास लाखापर्यंतच्या घोड्यांची येथे खरेदी विक्री होत असते. दरवर्षी दसऱ्याच्या आधी येणाऱ्या मंगळवारी हा बाजार खूप मोठ्या प्रमाणात भरतो. दसऱ्यापूर्वी भरलेला हा बाजार लक्षवेधी ठरला.

सारंगखेडा येथील प्रसिध्द घोडेबाजार वर्षभरातून एकदाच भरतो. तो दत्त जयंती निमित्त. शिरपूर येथील घोडे बाजार दांडी पौर्णिमेला तर सोलापूर जिल्ह्यातील अकलूजचा घोडे बाजार कार्तिकी एकादशीला. या सर्व ठिकाणच्या घोडा बाजाराला कालमर्यादा आहे. मात्र, नाशिक जिल्ह्यातील येवल्यात मंगळवारच्या आठवडे बाजाराच्या दिवशी भरणारा घोडे बाजार हा वर्षभर अगदी अव्याहतपणे चालत असतो, ही मोठी खासीयत.

यंदाच्या दसरा सणाच्या अगोदर मंगळवारी भरलेला येथील घोडाबाजार सर्वांचेच लक्ष वेधणारा ठरला. एरवी आठवडे बाजारात जवळपास १०० च्या आसपास घोडे दाखल होत असतात. मात्र, यंदाच्या दसऱ्याच्या अगोदरच्या खास घोडा बाजारात हजारावर घोडे दाखल झाले होते. त्यामुळे सकाळपासून सायंकाळपर्यंत बाजार समितीचा आवार अगदी फुलून गेला हाेता. पंजाब, मारवाड, शिरपूर, काठेवाड, सिंधी, गावरान आदी जातींचे व देवमन, पंचकल्याण, चार पाय सफेद, अबलक, मुकरा अशा अनेक गुणांचे घोडे या मंगळवारच्या घोडा बाजारात दाखल झाले होते.

बातम्या आणखी आहेत...