आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेल्पलाइन:अवैध धंद्याची माहिती देण्यासाठी 6262256363 हेल्पलाइन

नाशिक4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्याची माहिती देण्यासाठी अधीक्षक शहाजी उमाप यांनी हेल्पलाइन सेवा सुरू केली आहे. ४० पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्याची माहिती देण्यासाठी ६२६२२५६३६३ या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन अधीक्षकांनी केले आहे. अधीक्षक शहाजी उमाप यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील अवैध धंदे समूळ उच्चाटन करण्यासाठी नियोजन केले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाकडून मटका, जुगार, अवैध वाळु वाहतूक, उपसा, गावठी दारु अड्डे, अवैध मद्य विक्री आदी अवैध धंद्यांवर धडक कारवाई सुरू केली आहे. अवैध धंदे समूळ उच्चाटन करण्यासाठी नागरिकांसाठी हेल्पलाइन नंबर दिला आहे. या नंबरवर माहिती दिल्यास तत्काळ कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. पथकाने आजपर्यंत ३२१ अवैध धंद्यांवर कारवाई करत ३७० संशयित आरोपींना अटक केली आहे. कारवाई एक कोटी ४५ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

नागरिकांनी हेल्पलाईनचा वापर करावा
जिल्ह्यात अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. ग्रामीण पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. जिल्ह्यातील ४० पोलिस ठाण्याच्या हद्दीत कुठेही अवैध धंदे सुरू असल्यास हेल्पलाइनवर संपर्क साधावा. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाईल. तक्रारीची दखल घेत तत्काळ कारवाई केली जाईल.- शहाजी उमाप, पाेलिस अधीक्षक

बातम्या आणखी आहेत...