आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी स्पाॅट रिपाेर्ट:सुशाेभीकरणासाठी 64 काेटींचा खर्च; गाेदा प्रदूषणाकडे मात्र साेयीस्कर दुर्लक्ष

सचिन जैन | नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गाेदाघाट परिसराच्या सुशाेभीकरणासाठी स्मार्टसिटीअंतर्गत तब्बल ६४ काेटी रुपये खर्चून या ठिकाणी वेगवेगळी कामे हाती घेण्यात आली असली तरी प्रत्यक्षात याच गाेदावरी नदीच्या स्वच्छतेकडे साेयीस्कर दुर्लक्ष करण्यात येत आहे. रामकुंडावरील छत्रीच्या जवळच गाेदापात्रात शेवाळ साचले असून निर्माल्य, प्लास्टिक पिशव्यांचा खच पडला आहे. परिणामी प्रदूषणात अधिकच भर पडत आहे. एकीकडे सुशाेेभीकरणाच्या नावाखाली काेट्यवधींचा खर्च हाेत असताना मात्र, दुसरीकडे गाेदाघाटावरील मुख्य ठिकाण असलेल्या रामकुंडावरील प्रदूषणाकडे प्रशासनाकडून हाेत असलेल्या दुर्लक्षामुळे स्थानिकांसह पर्यटकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

स्मार्ट सिटी म्युनसिपल काॅर्पाेरेशनच्या वतीने नाशिक शहरात विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्येच देशभरातून माेठ्या संख्येने नागरिक दशक्रिया विधीसाठी नाशकात रामकुंडावर येत असतात. त्याचप्रमाणे गाेदाघाटावरील विविध मंदिरात दर्शनासाठी तसेच गाेदापात्र बघण्यासाठी पर्यटक येतात.

मनपाकडून स्वच्छतेचा फार्स
गाेदाघाटावर नियमित सकाळी व सायंकाळी किमान १०० हून अधिक सफाई कर्मचाऱ्यांच्या वतीने स्वच्छता केली जात असल्याचा दावा मनपा आराेग्य व स्वच्छता विभागाकडून केला जात आहे. प्रत्यक्षात गाेदाघाटावर जागाेजागी अस्वच्छता दिसून येत आहे.

गाेदा स्वच्छता करा, अन्यथा आंदाेलन
गाेदा स्वच्छतेकडे दुर्लक्ष हाेत असल्याने गाेदाप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. सुशाेभीकरणाआधी गाेदावरी प्रदूषणमुक्त करा, नियमित स्वच्छता करा, अन्यथा आंदाेलन केले जाईल. - देवांग जानी, गाेदाप्रेमी संघटना

बातम्या आणखी आहेत...