आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेट‎:6.5 किलाेचा चांदीचा मुकुट‎ श्री स्वामी समर्थांना अर्पण‎

नाशिक‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

त्र्यंबकेश्वर येथील श्री स्वामी समर्थ‎ गुरुपीठातील श्री स्वामी समर्थांच्या‎ मूर्तीसाठी काेळसेवाडी येथील‎ भाविकाने तब्बल साडेसहा किलाे‎ चांदीचा मुकुट अर्पण केला आहे.‎ विशेष म्हणजे, या मुकुटाला‎ साेन्याची पॉलिश केलेली असल्याने‎ त्याला सुवर्ण झळाळी मिळाली‎ आहे. गुरुपीठात विशेष कार्यक्रमात‎ हा मुकुट या भाविकाच्या हस्ते‎ मूर्तीला चढविण्यात आला.

श्री‎ स्वामी समर्थांचा जयघाेष यावेळी‎ भाविकांनी केला.‎ मुळचे दिंडाेरी तालुक्यातील‎ आणि सध्या कल्याण जवळील‎ काेळसेवाडी येथील साहेबराव‎ कावळे हे स्वामी समर्थांचे ४०‎ वर्षांपासून निस्सीम भक्त आहेत.‎ काही वर्षांपासून असा मुकुट‎ स्वामींना अर्पण करण्याची इच्छा‎ हाेती. त्यानुसार त्यांनी हा मुकुट‎ बनवला असून याला साडेसहा‎ किलाे चांदी वापरण्यात आली‎ आहे.‎

बातम्या आणखी आहेत...