आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिव्य आकांक्षा सामाजिक बहुउद्देशीय संस्था, महापालिका अाणि इंद्रजित टेक्निकल इन्स्टिट्यूटकडून ४० महिलांना बेकरी उत्पादनाचे तर २५ महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण देण्यात अाले. महिला स्वावलंबी व्हाव्यात याकरीता हा उपक्रम संस्थांनी संयुक्तपणे माेफत राबविला. विशेष कार्यक्रमात मराठमोळी नऊवारी साडी शिवण कार्यशाळेमध्ये सहभागी झालेल्यांना तसेच बेकरी पदार्थ कार्यशाळेत सहभागी महिलांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन दिव्य अाकांक्षाच्या अध्यक्षा व माजी नगरसेविका श्रीमती अर्चना संजय जाधव यांनी केले. कार्यक्रमास इंद्रजित टेक्निकल इन्स्टिट्यूटचे संचालक कैलास सोनवणे, धनंजय खैरनार, प्रत्यूषा महिला मंडळाच्या अध्यक्षा स्वाती बेलदार, जयश्री वैद्य, छाया पोटे उपस्थित होते.
यावेळी नऊवारी प्रशिक्षित महिलांचे रॅम्पवॉक, एक मिनिट उखाणे स्पर्धा, मनोरंजन पर खेळ घेण्यात आले. रॅम्पवॉकविजेत्या महिलांना बक्षिसे देण्यात आली. बचतगटाद्वारे शासनाच्या अनेक योजना राबविल्या जातात त्या आपण सहभागी महिलांचे बचतगट स्थापन करूनराबवू असे यावेळी इंद्रजितचे संचालक कैलास सोनवणे यांनी सांगितले.
स्वाती आहेर, मंगला पाटील, सीमा शिंदे या महिलांनी कार्यशाळेतील आपले अनुभव व्यक्त केले. कार्यक्रमास वैष्णवी भजनी मंडळाच्या रजनी सराफ, मालती कोठावदे, कुसुम सुतार सीमा कुलकर्णी तसेच श्री गृह उद्योगच्या स्मिता घोटीकर, मालती सराफ यांसह परिसरातील महिला मोठा संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती आष्टीकर यांनी केले. अर्चना जाधव यांनी अाभार मानले. कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.