आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुक्त विद्यापीठाचे 654 केंद्र बंद:वरिष्ठ महाविद्यालयात करावे लागणार स्थलांतर, युजीसीचे स्पष्ट निर्देश

नाशिक6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे केंद्र हे वरीष्ठ महाविद्यालयांमध्येच असावे, असे स्पष्ट निर्देश युजीसीने दोन वर्षापुर्वीच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठासह सर्वच विद्यापीठांना दिले होते. पण कोरोनाच्या काळात त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुक्त विद्यापीठाला आता 32 अभ्यासक्रमांचे कनिष्ठ महाविद्यालयांतील 654 केंद्र बंद करावी लागली आहे. त्यामुळे या केंद्रांवरील विद्यार्थ्यांची आता मोठी अडचण होणार असून, विद्यापीठाला तत्काळ ही केंद्र वरीष्ठ महाविद्यालयांता स्थलांतरीत करावी लागणार आहेत.

गुणवत्ता वाढ आणि दर्जेदार शिक्षणासाठी विद्यापीठ अनुदान अयोगाने विद्यापीठांसाठी नियमावली ठरवून दिली आहे. त्यानुसार मुक्त विद्यापीठासाठीही नियमावली असून, पदवी आणि पदव्युत्तरचे अभ्यासक्रम हे वरीष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांकडून शिकविले जाणे आवश्यक आहे. प्राध्यापक असतील त्याच ठिकाणी केंद्र सुरु करणे अत्यावश्यक असतानाही मुक्त विद्यापीठाने नियमांना पायदळी तुडवित कनिष्ठ महाविद्यालयांत पदवी आणि पदव्युत्तरचे अभ्यासक्रम सुरु केले. काही ठिकाणी तर शाळांमध्ये अन् संगणकीय अभ्यासक्रम तर खासगी प्रशिक्षण संस्थांमध्ये सुरु केले आहेत.

अभ्यासक्रम बंद करा

हे अत्यंत गंभीर असल्याचे ताशेरे ओढत युजीसीने असे अभ्यासक्रम तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. आयोगाच्या परवानगीनेच वरीष्ठ महाविद्यालयात ते सुरु करा. असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे तुर्तास 32 अभ्यासक्रमांचे 1551 पैकी 654 अभ्यासक्रम बंद पडले आहेत. त्याचे प्रवेशही विद्यापीठाने थांबविले आहेत. आता आयोगाकडून परवानगी मिळाल्यानंतरच ते सुरु होणार असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.

बंद पडलेली केंद्र

अमरावती - 105

औरंगाबाद -51

मुंबई -79

नागपूर -73

नाशिक -76

पुणे -86

कोल्हापूर-75

नांदेड -109

तुर्तास या केंद्रावरील प्रवेश स्थगित

पदवी आणि पदव्युत्तरचे 32 अभ्यासक्रमांच्या केंद्राबाबत हा निर्णय आहे. तुर्तास ते स्थगित केले आहे. प्रवेशही थांबविले आहेत. पण विद्यार्थी हितासाठी युजीसीकडून आम्ही पुन्हा अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. जवळच्या वरीष्ठ महाविद्यालयात लवकरच केंद्र सुरु केले जातील. अशी प्रतिक्रिया मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव डाॅ. प्रकाश देशमुख यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...