आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

65 वी महाराष्ट्र राज्य कुस्ती स्पर्धा:नाशिक शहर तालीम संघाची चाचणी , स्पर्धेत 90 कुस्तीगीरांचा सहभाग

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे संलग्न नासिक शहर तालीम संघाच्या वतीने महाराष्ट्र केसरी किताब व राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी नाशिक शहर तालीम संघाच्या चाचणी कुस्ती स्पर्धा आडगाव व्ययाम शाळा भिकाजी पाटील तालीम संघाच्या मैदानावर रंगल्या.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष व नासिक शहर तालीम संघाचे अध्यक्ष संजय चव्हाण व महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे कार्यकारी सदस्य पहीलवान हिरामण नाना वाघ यांच्या उपस्थीतीत कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या. कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन भिकाजी पाटील शिंदे, अशोक शिंदे, भाऊसाहेब देशमुख, शुभम शिंदे. माळोदे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडली.

नाशिक महानगरातील तालीम संघाच्या वतीने सुमारे 90 कुस्तीगीरांनी सहभाग घेतला.नाशिक नासिक शहर तालीम संघाचे तांत्रीक पंच आधीकारीसर्जेराव वाघ यांची पंच कमेटी आखाडा प्रमुख संदीप सहाणे, तुषार कालेकर,पंच संदीप निकम,कीरण भडांगे, राजेंद्र ठोंबरे, वेळाधीकारी उत्तम कर्पे सुत्रसंचलन समालोचक अविनाश फडोळ यांनी चोख कामगिरी बजावलीआदीमान्यवर उपस्थित होते. विजयी कुस्तीगीर संघ पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी किताब 65 वी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत नासिक शहर तालीम संघाच्या वतीने खेळणार आहे.

विजयी झालेले कुस्तीगीर खालीलप्रमाणे.

माती विभाग---५७,की ज्ञानेश्वर टोंगारे,(प्रथम). सचिन दिवे (द्वीतीय),

६१ की, संदीप बोडके (प्रथम), गोकुळ खाडे (द्वीतीय)

६५ की, संदीप मते (प्रथम), योगेश पारधी (द्वीतीय),

७० की, भुषण पाटील,(प्रथम) वैभव मते,(द्वीतीय), ७४ की, रोहीदास भडांगे (प्रथम), कार्तीक मुरकुटे (द्वीतीय)

७९, की,श्रीराज चहाळे,(प्रथम),

मनोज भांगरे,(द्वीतीय).

८६ की, देवीदास टेकनर (प्रथम),

९२की, रोशन सानप (प्रथम)

आदीत्य जाधव (द्वीतीय),

९७ की, मिलींद नेटावणे (प्रथम)

८६ ते १२५ की, महाराष्ट्र केसरीगट. नारायण मार्कंड,(प्रथम),

गादी विभागात---

५७ की,समीर ठमके (प्रथम).

‌सचिन दिवे,(द्वीतीय),

६१, की, राज मोरे.(प्रथम)

वेदघोष मते ( द्वीतीय).

६५ की, सागर बर्डे ( प्रथम).

ऋषिकेश पोटींदे,(द्वीतीय)

७० की, निलेश सुर्यवंशी.(प्रथम)

विराट बागुल ( द्वीतीय).

७४ की, सार्थक नागरे,( प्रथम).

विशाल शिंदे,( द्वीतीय)

७९ की, विजय सुरुडे,( प्रथम).

विजय तांबे,( द्वीतीय)

८६, की, ओमकार झाडे,(प्रथम).

किरण पवार,( द्वीतीय).

९२ की, दिपक डूकळे (प्रथम)

विजय डूकळे ( द्वीतीय).

९७ की, स्वराज आवारे,(प्रथम)

चैतन्य शेलार,(द्वीतीय)

८६ ते १२५की, महाराष्ट्र केसरी गट,. कार्तीक गवळी,( प्रथम).

विजय खैरनार,( द्वीतीय.)

बातम्या आणखी आहेत...