आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षसंवर्धन:यंदा 67 वृक्षांची लागवड, 2014 पासून वृक्षसंवर्धन;श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टतर्फे पर्यावरण दिन

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक पर्यावरण दिनाच्या मुहूर्तावर व पर्यावरण संवर्धनाच्या हेतूने श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या वतीने श्रीक्षेत्र सप्तशृंगगड येथे पर्यावरणाचा संदेश देण्यात आला. शिवालय तिर्थ परिसरात विविध औषधी व बहुउपयोगी वनस्पतीयुक्त ६७ वृक्षांची लागवड जिल्हा न्यायाधीश तथा सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे अध्यक्ष वर्धन पी. देसाई व त्यांच्या पत्नी अरुंधती देसाई यांच्या हस्ते करण्यात आली.

संस्थेचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी संस्थेचा यंंदाचा ६७ वा वर्धापनदिन विचारात घेता वृक्षारोपणाची संख्या ही ६७ निर्धारित केली असल्याचे सांगितले. २०१४ पासून दरवर्षी संस्थेच्या वतीने सदरचा वृक्षारोपणाचा उपक्रम जागतिक पर्यावरण दिनाच्या मुहूर्तावर घेतला जातो. आजपावेतो एकूण ५५० पेक्षा अधिक झाडांची लागवड करण्यात आली असून त्यातील बहुसंख झाडे जतन करण्यात आलेली आहेत. तसेच सदर प्रकल्पासाठी सामाजिक वनीकरण, वन विभाग यांचे आवश्यकतेनुसार सहकार्य तसेच मा अध्यक्ष व विश्वस्त मंडळाचे अमूल्य मार्गदर्शन उपलब्ध होत आहे.

भविष्यकाळात अधिकतम संख्येने सदरचा उपक्रम निर्धारित करून संपूर्ण गडावर निसर्गाला हिरवी चादर परिधान करण्याचा मानस असून कार्यालयीन व्यवस्थापन स्मृतीवन उपक्रमासाठी सातत्त्यपूर्वक प्रयत्नशील आहे. याप्रसंगी अधीक्षक प्रकाश जोशी, सुरक्षाधिकारी यशवंत देशमुख तसेच विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रमोद देशमुख, संतोष चव्हाण, अशोक पवार, राजेंद्र पवार, चंदर गवे, बाळू पवार, शांताराम बर्डे, राज जोशी, केशव पवार, खंडू वाघ, रवींद्र पवार आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...