आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिकेच्या शाळांची अवस्था व शिक्षणाचा दर्जा चिंतनाचा विषय असताना 70 काेटी 30 लाख रूपये र्खचून 112 शाळा स्मार्ट केल्या जाणार असून त्यातील 69 शाळा डिसेंबरपासून स्मार्ट केल्या जाणार आहेत. पालकमंत्र्यांनी पंचक भागातील शाळेवर जाऊन बैठक घेत यासंदर्भात आढावा घेतला.
आयुक्तपदी कैलास जाधव असताना त्यांनी पालिकेच्या शाळांना स्मार्ट करण्याची याेजना मंजुर केली. त्यासाठी समिती स्थापन करण्यापासून तर बरेच प्रयत्न झाले मात्र मुर्त स्वरूप मिळाले नाही. जाधव यांच्या बदलीनंतर आलेल्या रमेश पवार यांनीही आयुक्त म्हणून स्मार्ट स्कुल संकल्पनेला मुर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, पालिका शाळांमध्ये गुणवंत विद्यार्थी असून केवळ पायाभुत सुविधा व्यवस्थित नसल्यामुळे त्यांची शैक्षणिक प्रगती हाेत नसल्याची बाब पुढे आली. हे लक्षात घेत पालकमंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी (दि. 11) पंचक भागातील मनपा शाळा क्रमांक 49 मध्ये बैठक घेतली. त्यावेळी त्यांना स्मार्ट स्कुल संकल्पनेची माहिती दिल्यानंतर त्वरीत याेजनेची अंमलबजावणी करावी असे आदेश दिले.
दरम्यान, शाळेची अवस्था बघून पालकमंत्र्यांनी चांगलीच झाडझडती घेतली. स्वच्छतागृहे, संरक्षक भिंती, खेळ सामुग्री, डिजीटल साहित्य या मुद्यांकडेही लक्ष देण्याचे आदेश दिले.
50 हजार विद्यार्थी संख्येचे उद्दीष्ट
मनपा शाळेच्या 74 इमारतींपैकी पाच इमारतींची स्थिती योग्य नसल्यामुळे त्वरित दुरुस्ती किंवा नवीन बांधकाम करण्याचे नियोजन करावे. त्यासाठी सीएसआर फंडाची मदत घेण्याची सुचना त्यांनी केली. सध्यस्थितीत मनपा शाळेतील विद्यार्थी संख्या 29 हजार असून यापुर्वी 40 हजार विद्यार्थी हाेते. आता पुढील वर्षी 50 हजार विद्यार्थ्यांचे उद्दीष्ट देण्यात आले.
मुलांची अक्षर ओळख तपासणी
भुसे यांचे विद्यार्थ्यांनी लेझीम आणि ढोल वादन करुन स्वागत केले. बैठकी अगोदर भुसे यांनी दुसरी 'क' च्या वर्गात जाऊन मुलांशी संवाद साधत त्यांची अक्षर ओळख क्षमता तपासली. बैठकीला मनपाच्या प्रभारी अतिरीक्त आयुक्त अर्चना तांबे, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, स्मार्ट सिटीचे सीईओ सुमंत मोरे आदी उपस्थित होते.
अशी असणार स्मार्ट स्कूल
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.