आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:गतवर्षीपेक्षा 6.92 टक्के निकाल कमी; 92.65 % पास

नाशिक23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारावीच्या निकालात विभागात नाशिक जिल्ह्याचा निकाल ९२.६५% लागलाआहे. गतवर्षी ९९.५७ टक्के लागला हाेता. यात ९५.१८% मुली उत्तीर्ण झाल्याआहेत. तर जिल्ह्यात ९२.४२% मुले उत्तीर्ण झालीआहेत. नाशिकमध्ये विज्ञान शाखेचे सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेचे ३१४०४ प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ३०८१५ उत्तीर्ण झाले. तर कला शाखेचे २५४५३ पैकी २२५६० विद्यार्थी उत्तीर्ण झालेआहेत. वाणिज्यचे १३४३९ पैकी १२२८६ विद्यार्थी उत्तीर्ण झालेआहेत. कला व वाणिज्य शाखेच्या तुलनेत विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९८.७५% निकाल लागलाआहे.

गुण पडताळणीसाठी १० जूनपासून संधी
ज्या विद्यार्थ्यांना गुण पडताळणी करायचीआहे, त्यांना शुक्रवार दि. १० ते २० जून २०२२ या कालावधीत अर्ज करता येणार आहे. छायाप्रतीसाठी १० ते २९ जून २०२२ दरम्यान ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणारआहे.
पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये
बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळातर्फे जुलै वआॅगस्ट महिन्यात पुरवणी परीक्षा घेतली जाणारआहे. श्रेणीसुधार करण्यासाठी विद्यार्थ्यांना १० जूनपासून मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येतील.

शाखा प्रविष्ट उत्तीर्ण एकूण मुले मुली
विद्यार्थी विद्यार्थी टक्के (टक्के) (टक्के)
विज्ञान ७४३२२ ७३३९७ ९८.७५ ९८.५७ ९८.९९
कला ५९०३० ५३८७९ ९१.२७ ८९.५३ ९३.४९
वाणिज्य २१९९३ २०६४० ९३.८४ ९२.९३ ९४.७५
व्होकेशनल ५१७२ ४६९५ ९०.७७ ९०.२० ९२.६१
टेक सायन्स ९३ १८ १९.३५ १८ १९.५६
एकूण १६०६१० १५२६२९ ९५.०३ ९४.१४ ९६.१७

बातम्या आणखी आहेत...