आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापावसाळ्यात वीज जोडणी खंडीत झाल्यानंतर वीज वितरण कंपनीने वेळेत जोडणी न करता वाढीव बिल दिले. याविरोधात ग्राहक न्यायालयात वीज वितरण कंपनीच्या विरोधात ग्राहक न्यायालयाने तक्रार दाखलल केली होती. न्यायालयाने दोन्ही बाजुचा युक्तीवाद एकून घेत वीज वितरण कंपनीला शेत पिकांचे नुकसानपोटी १ लाख आणि घरगुती आणि कृषीपंप या दोन्ही विजजोडणी प्रतिदिन १२०० प्रमाणे ७ लाख ९२ हजार रुपये देण्याचे आदेश दिले.
ग्राहक न्यायमंचाने दिलेल्या निकालानुसार, मधुकर ठोंबरे रा. सोमठाण सिन्नर, विलास देवळे यांनी शेतात कृषी पंप घरगुती विज जोडणी केली आहे. दोन्ही स्वतंत्र मिटर असून विज बिले नियमित भरलेली आहे.
२०१६ मध्ये पावसाने विजपुरवठा बंद झाला. विज वितरण कंपनीचे वायपमन यांना कळवले. लेखी तक्रार केली. विज वितरण कार्यालयाकडून पोल आणि साहित्य मिळाल्यानंतर दुरस्थी केली जाईल असे सांगीतले. पुरवठा बंद असल्याने शेताती डाळिंब पिकाला पाणी देता आले नाही.
घरातील लाईट बंद असल्याने असुविधा झाल्याने मुख्य अभियंता मुंबई आणि कार्यकारी अभियंता ग्रामीण, उपकार्यकारी अभियंता सिन्नर यांच्या विरोधात ग्राहक न्यायमंचाकडे तक्रार केली होती. तक्रारीमध्ये खंडीत विज पुरवठामुळे डाळिंब पिकांचे नुकसान भरपाईपोटी ६ लाख ५० हजार आणि २०१६ ते २०१७ याकालावधीत विजजोडणीचे प्रतिदीन १२०० प्रमाणे ७ लाख ९२ हजार मिळावे अशी तक्रार केली होती. विज वितरण कंपनीकडून यास विरोध करत विज बिल दुरस्थ करुन देण्याचे मान्य केले होते. या कालावधीत विज पुरवठा खंडीत झालेला नव्हता असा बचाव केला. न्यायमंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्य प्रेरणा काळुंखे, सचिन शिंपी यांनी दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकून घेत डाळिंब पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी अधिकाऱ्याचा अहवाल सादर केलेला नाही. विज पुरवठा खंडीत झाल्याच्या कालावधीत कंपनीने ग्राहकाला प्रतिदीन जोडणी १२०० प्रमाणे ७ लाख ९२ हजार पिकांच्या नुकसान भरपाईपोटी १ लाख रुपये देण्याचे आदेश दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.