आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिवसागणिक वाढता तोटा लपवण्यासाठी महापालिकेच्या सिटी लिंक प्राधिकरणाने प्रवाशांवर भाडेवाढीचा वरवंटा फिरवण्याची तयारी सुरू केली आहे. जानेवारी महिन्यापासून भाडेदरात ७ टक्के वाढीचा प्रस्ताव नाशिक महानगर परिवहन महामंडळाने प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाला सादर केला आहे.
शहरात ८ जुलैपासून सिटी लिंक बस सुरू झाली असून मार्च महिन्यापर्यंत सुमारे २७ कोटी रुपयांचा तोटा होईल, असा दावा तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांनी केला होता. हा तोटा दिवसागणिक वाढत असून तो भरून काढण्यासाठी सध्या ग्रामीण भागामध्ये बसेस सुरू केल्या आहेत. मात्र तरीही ताेटाच हाेत असल्याचे बघून आता भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सिटी लिंकच्या करारानुसार दरवर्षी ५ टक्के भाडेवाढ अनुज्ञेय आहे. जानेवारी २०२२ मध्ये पहिल्या टप्प्यातील ५ टक्के भाडे दरवाढ करण्यात आली होती. मात्र इंधन दरवाढीमुळे सिटी लिंकचा तोटा वाढल्याचे कारण दिले जात आहे. त्यामुळे यंदा ५ टक्क्यांऐवजी ७ टक्के भाडेवाढीस आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखालील संचालक मंडळाच्या बैठकीत गेल्या महिन्यात मंजुरी घेण्यात आली होती. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या मंजुरीशिवाय भाडेवाढ लागू करता येत नसल्यामुळे हा प्रस्ताव प्राधिकरणाला सादर केलेला आहे.
तिकीटही राउंड फिगर शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पासच्या दरातही वाढ होणार आहे. सुट्या पैशांची अडचणी निर्माण होत असल्याने वाहक आणि प्रवाशांमध्ये वाद होतात. त्यामुळे तिकीट दरही राउंड फिगरमध्ये आकारले जाणार आहेत. हा देखील अप्रत्यक्षपणे दरवाढीचा फटका असेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.