आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:7 कोटींचे इनडोअर क्रीडा संकुल; 7 वर्षांपासून वापराविना आउटडोअरच ; विजेचा प्रश्न कायम; सध्या चालते क्रीडांगणात कोविड लसीकरण

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र शासनाच्या निधीतून महापालिकेच्या जागेवर उभारण्यात आलेले इनडोअर क्रीडांगण मधल्या काळात कोरोना आणि त्यानंतर वीजपुरवठा नसल्याने अद्यापही खेळाडूंसाठी सुरू करण्यात आलेले नाही. अर्थात गेल्या सात वर्षांपासून ते बंदच आहे. त्यामुळे जेलरोड परिसरातील खेळाडूंमध्ये संताप व्यक्त होत आहे. जेलरोड, नाशिकरोड भागातील खेळाडूंना हक्काचे क्रीडांगण उपलब्ध व्हावे यासाठी केंद्र शासन आणि महापालिकेच्या वतीने जेलरोड येथील पिंटो कॉलनी परिसरात इनडोअर क्रीडांगणासाठी २०१५ मध्ये सहा कोटी ७५ लाख रुपये मंजूर झाले. २०१६ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. या क्रीडागणांमध्ये बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुद्धिबळ, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, लॉन टेनिस यांसह विविध खेळांसाठी वापर करण्यात येणार होता. मात्र, क्रीडांगणाच्या उद्घाटनापासून ते कधी खुलेच झाले नाही. सध्या या ठिकाणी कोविडच्या लसीकरणासाठी जागा देण्यात आली आहे. त्यापूर्वी हे मद्यपींनी ही जागा हक्काची करून ठेवली होती. नाशिकरोड आणि जेलरोड या विभाग मिळून सर्वात मोठे आणि एकमेव इनडोअर क्रिंडागण येथे आहे, परंतू महापालिकेच्या दुर्लक्षामुळे धुळखात पडून आहे. मंजूर निधी तसाच पडून : हे क्रिडांगण केंद्र शासनाच्या निधीतून मनपाच्या जागेवर झाले असून यासाठी खासदार हेमंत गोडसे, तत्कालीन मनपा आयुक्त प्रविण गेडाम, क्रिडा अधिकारी संजय सबनीस आणि मनपा बांधकाम अभियंता नीलेश साळी यांनी त्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र त्यानंतर महापालिकेच्या इतर विभागांनी दुर्लक्ष केल्यामुळे ही वास्तू तशीच पडून आहे. या इनडोअर क्रिडांगणातील खेळाच्या साहित्यासाठी १ कोटी ५ लाख रुपये देखील मंजुर करण्यात आले होते. मात्र मंजुर झालेला निधी तसाच पडून आहे.

बातम्या आणखी आहेत...