आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपासणी:आराेग्य तपासणीत 70 नागरिकांना मधुमेह

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंचवटीतील अमृतधाम येथील श्री वरद गणेश मंदिर येथे श्री सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनतर्फे मधुमेह, नेत्रतपासणी व सर्व रोगनिदान शिबिर घेण्यात आले. यात १५० हून अधिक नागरिकांनी माेफत तपासणी करण्यात आली. या तपासणी शिबिरात ७० रुग्णांना मधुमेह, २५ रुग्णांना हृदयरोग, १५ नेत्ररोग, ३५ महिलांना गर्भाशयासंदर्भातील आजार असल्याचे समाेर आहे.

श्री सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनतर्फे आठ वर्षांपासून नाशिकसह महाराष्ट्रात धार्मिक कार्यक्रमासोबत समाजाेपयोगी उपक्रम घेण्यात येतात. त्यात वृक्षारोपण, आरोग्य शिबिर, विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान, चर्चासत्र, गोरगरीब, आदिवासी घटकांच्या उद्धारासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. दरवर्षाप्रमाणे यंदाही मिशनच्या वतीने नेत्रतपासणी, सर्व रोगनिदान शिबिर सुश्रुत हॉस्पिटल, सांगळे मॅटर्निटी हॉस्पिटल, महालक्ष्मी क्लिनिकल लॅबोरेटरीच्या सहकार्याने राबविण्यात आले. या तपासणी िशबिरात परिसरातील नागरिक माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते.

सुश्रुत हॉस्पिटलच्या डॉ. अमन रासकर, माधुरी केदारे, मनीषा वाघमारे, योगिता चौबे, सांगळे हॉस्पिटलचे बालरोग चिकित्सक डॉ. धनंजय सांगळे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. गायत्री सांगळे, तसेच महालक्ष्मी क्लिनिकल लॅबोरेटरीच्या डॉ. रूपाली गुट्टे, प्रियांका सोनवणे यांनी रुग्णांची तपासणी केली. कार्यक्रमास श्री सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे, दिलीप अहिरे भाविक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...