आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डीतील शिबिराची सांगता:नाशिकच्या 70 पदाधिकाऱ्यांनी घेतले निवडणूक रणनितीचे धडे

प्रतिनिधी । नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सव्वा वर्षावर येवून ठेपलेली लोकसभा निवडणुक, जानेवारी महिन्यात संभाव्य पालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्यापार्श्वभुमीवर राष्ट्रवादीच्या नाशकातील ७० पदाधिकाऱ्यांनी शिर्डी अधिवेशनात उपस्थित राहून गत दोन दिवसांत आगामी प्रचार निती कशी असावी, कशापद्धतीने लोकांमध्ये जागृती करायची व राष्ट्रवादीला पुन्हा सत्ता कशी मिळवून द्यायची याविषयी धडे घेतले.

नाशकात राष्ट्रवादीची स्थापनेपासूनच मोठी ताकद आहे. जिल्ह्यात सर्वाधिक सहा आमदार आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना सर्वाधिक आमदार म्हणून पालकमंत्रीपदही छगन भुजबळ यांच्याच रूपाने नाशिककडे राहीले. जिल्हा परिषदेची सत्ताही अनेक वर्षापासून राष्ट्रवादीकडेच होती मात्र गेल्या निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली. शहरात मात्र राष्ट्रवादीला जम बसवता आला नाही.

अर्थातच प्रतिकुल परिस्थीती शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी राष्ट्रवादीला चर्चत ठेवले. दरम्यान, राज्यातील सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर राष्ट्रवादीने विस्तारासाठी धडपड सुरू ठेवली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिर्डी अधिवेशनात आगामी निवडणुकांबाबत प्रचार व रणनिती कशी असावी याचे धडे देण्यात आले. नाशकातून जवळपास ७० पदाधिकारी अधिवेशनात सहभागी झाल्याचे सांगितले जाते. त्यात माजी खासदार, विद्यमान आमदार व माजी आमदार, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष तसेच अन्य फ्रंटलचे पदाधिकारी सहभागी होते. केंद्र व राज्यात भाजपाकडून चुकीच्यापदधतीने राबवली जाणारी धोरणे, तपास संस्थेचा गैरवापर, वाढती महागाई आदी मुद्याबाबत जनतेपर्यंत कसे जायचे याचे प्रशिक्षण देण्यात आले.

गुजरातला फाॅक्सकार्न; महाराष्ट्राला पाॅपकाॅर्न

अधिवेशनात अपेक्षेप्रमाणे माजी पालकमंत्री भुजबळ यांनी जोरदार भाषण केले. वेदांता - फॉक्सकॉन सारखा एक मोठा प्रकल्प गुजरातला पळवला गेला. पाठोपाठ आता टाटा एअरबसचा प्रकल्प गुजरातला दिवाळी गिफ्ट म्हणून दिला. विमान दुरुस्त करणारा ‘सॅफ्रन’ चा प्रकल्प हैदराबादला गेला. आमचे दोन अडीच लाख कोटींचे प्रकल्प घेऊन महाराष्ट्राला केवळ २ हजार कोटीचा प्रोजेक्ट दिला. हे म्हणजे त्यांनी गुजरातला फॉक्सकॉर्न दिला मात्र महाराष्ट्राला पॉपकॉर्न दिला अशी सडकावून टीका त्यांनी केली. आगामी काळातील निवडणुकांच्या दृष्टीने तयारी करावी असाही सल्ला दिला

बंद विमानसेवाही चर्चत

नाशिकमध्ये बंद पडलेल्या विमानसेवेचा मुद्दा अधिवेशनातही गाजला. अलायन्स एयर लाईन्स ही विमान कंपनी केंद्राच्या उडान प्रकल्पा अंतर्गत नाशिक मध्ये काम करत होती. उडानची स्कीम संपली मात्र कंपनीला चांगला फायदा होत होता. मात्र तरी या कंपनीला गुजरात मध्ये जाण्यास भाग पडले असे भुजबळांनी सांगितले.

प्रत्येक कार्यकर्त्याला प्रशिक्षित करणार

अधिवेशनात पक्षवाढ, कार्यकर्ता सक्षमीकरण तसेच भाजपाच्या दुटप्पी भुमिका याबाबत कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करणार. - रंजन ठाकरे, शहराध्यक्ष

बातम्या आणखी आहेत...