आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुढाकार:सौदी अरेबियातील 700 भारतीय कामगारांची सुटका, मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांचे प्रयत्न कामी

नाशिक7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात गेले चार महिने स्थानबद्धता केंद्रात अडकलेल्या जवळपास ७०० भारतीय कामगारांची सुटका करण्याबरोबरच त्यांच्या प्रवासाची तसेच भोजनाची व्यवस्था मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी केली.

काेरोनामुळे केलेल्या लॉकडाऊनमुळे हे कामगार तेथे अडकले होते. काहींच्या व्हिसाची मुदत संपली होती, नोकऱ्या गमावल्याने काही मिळेल ते काम करून गुजराण करत होते, तर काही निर्धन झाल्यामुळे अक्षरशः भीक मागत होते. या गोष्टी तेथील कायद्याला धरून नसल्याने सौदी पोलिसांनी त्यांची रवानगी स्थानबद्धता केंद्रात केली होती. डॉ. दातार यांना हे समजताच ते मदतीला धावून आले. दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासामार्फत जेद्दाहमधील दूतावासाशी संपर्क साधत स्थानिक प्रशासनाने कामगारांना तुरुंगवासातून सोडत त्यांना मायदेशी रवाना करण्याची तयारी केली.

खरोखरच भला माणूस : मुक्त झालेले हे कामगार नुकतेच मायदेशी परतले तेव्हा त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले आणि त्यांनी डॉ. दातार हे खरोखरच अल अदिल (भला माणूस) आहेत या शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली.

पाच हजार गरजूंना मदत
आखाती देशांत अडकलेल्या भारतीय कामगारांचा विमान तिकिटाचा, जेवणाचा व वैद्यकीय चाचणीचा पूर्ण खर्च उचलून त्यांना मायदेशी पाठवण्याची मोहीम राबवत आहोत. अल अदिल समूहाच्या सीएसआर उपक्रमांतर्गत आतापर्यंत ५००० गरजूंना रवाना केले. आता हे कामगार मुक्त झाले असून भारतात पोहाेचून कुटुंबीयांसमवेत समाधानात व सुरक्षित राहतील याचाच खूप आनंद आहे. - डॉ. धनंजय दातार

बातम्या आणखी आहेत...