आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:गणेश विसर्जनासाठी शहरात पालिकेतर्फे 71 स्थळे निश्चित

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मनपातर्फे नदीपात्राचे प्रदूषण रोखण्यासाठी गणेश विसर्जनाकरिता ७१ ठिकाणांची निश्चिती करण्यात आली आहे. ९ ऑगस्ट २०२२ पर्यंत गणेशोत्सव साजरा होत आहे. नाशिक महापालिकेच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.

पालिकेच्या विसर्जनस्थळांवर गणेश मूर्ती व निर्माल्य संकलित करण्यात येईल. यासाठी पालिकेने शहरातील सर्व सहा विभागात एकूण ७१ नैसर्गिक आणि कृत्रिम विसर्जनस्थळांची निश्चिती केली आहे. घरगुती आणि सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन नदीपात्रात न करता पालिकेच्या मूर्ती संकलन केंद्रांवर या मूर्ती दान द्याव्यात तसेच निर्माल्यही संकलन केंद्रांवर जमा करावे, असे आवाहन पालिका आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले. दीड, तीन, पाच, सात दिवसांच्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी नैसर्गिक विसर्जन स्थळे उपलब्ध असतील. कृत्रिम विसर्जनस्थळे हे फक्त दहाव्या दिवसाच्या विसर्जनाकरता उपलब्ध असतील याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...